नवी दिल्ली - ओडिशा सरकारशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना ओडीशा सरकारसोबत मिळून राज्यात वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी कामाला सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत. वीज आणि दुरसंचार सेवांना सद्यस्थितीत सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांनी चक्रीवादळ फानीने प्रभावित झालेल्या राज्यांकडे लक्षपूर्वक काम करावे, असेही निर्देश त्यांना देण्यात आले आहे.
ओडीशात वीज आणि दुरसंचार सेवा पुर्ववत करणे हीच प्राथमिकता - केंद्र सरकार - Odisha
कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांनी अधिकाऱ्यांना ओडीशा सरकारशी समन्वय साधून काम करण्याचे आदेश दिले आहेत. सिन्हा ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशच्या फानी चक्रीवादळग्रस्त भागात मदत उपायांचे पुनरावलोकन करण्यासाठी बनवलेल्या राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे अध्यक्ष आहेत. सिन्हा यांनी अधिकाऱ्यांना तेथे आवश्यक असणारी मदत तत्काळ पुरवण्यासाठी राज्य सरकारसोबत मिळून काम करण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली - ओडिशा सरकारशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना ओडीशा सरकारसोबत मिळून राज्यात वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी कामाला सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत. वीज आणि दुरसंचार सेवांना सद्यस्थितीत सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांनी चक्रीवादळ फानीने प्रभावित झालेल्या राज्यांकडे लक्षपूर्वक काम करावे, असेही निर्देश त्यांना देण्यात आले आहे.
ओडीशात वीज आणि दुरसंचार सेवा पुर्ववत करणे हीच प्राथमिकता - केंद्र सरकार
नवी दिल्ली - ओडिशा सरकारशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना ओडीशा सरकारसोबत मिळून राज्यात वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी कामाला सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत. वीज आणि दुरसंचार सेवांना सद्यस्थितीत सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांनी चक्रीवादळ फानीने प्रभावित झालेल्या राज्यांकडे लक्षपूर्वक काम करावे, असेही निर्देश त्यांना देण्यात आले आहे.
कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांनी अधिकाऱ्यांना ओडीशा सरकारशी समन्वय साधून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
सिन्हा ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशच्या फानी चक्रीवादळग्रस्त भागात मदत उपायांचे पुनरावलोकन करण्यासाठी बनवलेल्या राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे अध्यक्ष आहेत. सिन्हा यांनी अधिकाऱ्यांना तेथे आवश्यक असणारी मदत तत्काळ पुरवण्यासाठी राज्य सरकारसोबत मिळून काम करण्यास सांगितले आहे.
कॅबिनेट सचिवाने सांगितले की उर्जा आणि दूरसंचार सुविधा पुर्ववत करणे, या सद्यस्थितीतील महत्वाच्या बाबी आहेत. ऊर्जा मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालय ओडिशा सरकारशी समन्वय साधून काम करतील, असे सिन्हा यांनी सांगितले.
चक्रीवादळाने प्रभावित भागात हळूहळू वीज आणि दूरसंचार सुविधा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रविवारी झालेल्या बैठकीत ओडिशा सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पॉवर ट्रांसमिशन आणि वितरण प्रणालीवर भुवनेश्वर आणि पुरीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोबाइल सेवा थोड्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही शहरांतील ७० टक्के पाणी पुरवठा केला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पॉवर लाइन आणि टावर्सचे काम पूर्ण करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने ओडिशाला ५०० केव्हीए, २५० केव्हीए आणि १२५ केव्हीए क्षमतेचे डीझल जनरेटर आणि कामगार पाठवले आहेत.
आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्राने अतिरिक्त सहाय्य प्रदान करण्याची विनंती करण्यात आली आहे.
रेल्वेने रद्द केलेल्या १३८ गाड्यांपैकी ८५ गाड्या पुन्हा सुरू केल्या आहेत. भुवनेश्वरचा मुख्य मार्ग आता चालू झाला आहे. तर पुरी रेल्वे स्थानकावरील काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल. तर, काही दिवसांनी भुवनेश्वर विमानतळावरून उड्डाणे पुन्हा सुरू होईल, असेही सांगण्यात आले आहे.
पुरी, खुर्दा आणि भुवनेश्वरमधील बहुतेक रस्त्यांमधून एनडीआरएफने पडलेली झाडे बाजूला सारत रस्त्यांची वाहतूक पूर्ववत केली आहे. त्यामुळे या मार्गांवरील सामान्य रहदारी पुन्हा सुरू झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने वाहतूक विमान आणि हेलीकॉप्टरच्या मदतीने औषधे आणि इतर मदत साहित्य राज्यात पुरवले आहे.
Conclusion: