ETV Bharat / bharat

कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय....आता खासगी क्षेत्राला अवकाशाची दारं खुली - कुशीनगर विमानतळ

सरकारच्या निर्णयांचा कोट्यवधी लोकांना फायदा होणार असल्याचे म्हणत मोदींनी सर्व निर्णयांची माहिती ट्विटद्वारे दिली. सुधारणांचा आलेख पुढेच जात आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jun 24, 2020, 10:36 PM IST

नवी दिल्ली - कोरोना संकटातही देशातील आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी आज(बुधवार) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अवकाश क्षेत्र, शेतकरी सहाय्य, ग्रामीण विकास आणि लहान उद्योगधंदे यासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

सरकारच्या निर्णयांचा कोट्यवधी लोकांना फायदा होणार असल्याचे म्हणत मोदींनी सर्व निर्णयांची माहिती ट्विटरद्वारे दिली. सुधारणांचा आलेख पुढेच जात आहे, असे मोदी म्हणाले. अवकाश संशोधनातील सर्व कामांसाठी खासगी क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. अवकाशात संशोधनाचे कामही आता खासगी कंपन्यांना करता येणार आहेत. भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगत आणि आत्मनिर्भर करण्यासाठी अवकाश क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे खासगी क्षेत्राला चालना मिळले, असे मोदी म्हणाले.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत लघु आणि मध्यम उद्योगांना सहाय्य करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे एमएसएमई क्षेत्रात स्थिरता येईल, असे मोदी म्हणाले. पशू पालन विकास निधीचीही निर्मिती करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक वाढून पायूभूत सुविधांची वाढ होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

उत्तरप्रदेशातील कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार करण्यात येणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असे मोदी म्हणाले. या विमानतळामुळे दळवळणव्यवस्था सुधारेल. जास्त पर्यटक आणि भाविक म्हणजे जास्त संधी, असे मोदी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.