ETV Bharat / bharat

केरळमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागात 'रेड अलर्ट' जारी - heavy rainfall

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केरळमध्ये काही जिल्ह्यांना २० जुलै ते २४ जुलै दरम्यान अतिवृष्टी व धोक्याचा इशारा दिला आहे. केरळमधील कसारगोड, ईडुक्की, कन्नूर, वायनाड, कोझीकोडे, मलप्पुरम इ. जिल्ह्यांमध्ये रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना आपत्तीजनक परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये रेड अलर्ट
author img

By

Published : Jul 21, 2019, 10:28 AM IST

Updated : Jul 21, 2019, 11:27 AM IST

तिरुअनंतपुरम - केरळच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केरळमध्ये काही जिल्ह्यांना २० जुलै ते २४ जुलै दरम्यान अतिवृष्टी व धोक्याचा इशारा दिला आहे. केरळमधील कसारगोड, ईडुक्की, कन्नूर, वायनाड, कोझीकोडे, मलप्पुरम इ. जिल्ह्यांमध्ये रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना आपत्तीजनक परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

kerala
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये रेड अलर्ट

शनिवारी केरळमधील विविध भागातून सात मच्छीमार बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता मच्छीमारांपैकी तीन जण निंदकरा जिल्ह्यातील कोल्लम येथील असून इतर चार जण तिरूअनंतपुरम जिल्ह्यातील विझिंजमचे आहेत. राज्यातील नागरिकांना सावध राहण्याच्या व अत्यावश्यक सामानासह सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाचा जोर वाढतच असल्याने राज्यातील चार धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याच बरोबर राज्यसरकारकडून विविध ठिकाणी मदत छावण्यांची उभारणी देखील करण्यात आली आहे. किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरीत केले गेले आहे. कन्नूरमध्ये थवाक्करा रेल्वे स्थानकाजवळील अनेक घरांमध्ये पाणी भरले असून तेथील नागरिकांनासुध्दा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

काय आहे ऑरेंज अलर्ट

अतिशय प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवली असताना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. अशा परिस्थितीत नागरीकांनी अत्यावश्यक वस्तूंसह सुरक्षित ठिकाणी जाणे अपेक्षित असते.

Intro:Body:

patil j

Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.