ETV Bharat / bharat

खऱ्या आयुष्यातील 'डॉली की डोली' : उत्तर प्रदेशातील लुटारू तरुणी अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि तिची बहीण आपल्या तथाकथित मावशीसोबत मिळून, बऱ्याच काळापासून लोकांना लुटत आहेत. पूजाची मावशी आपल्या टोळीच्या मदतीने अशा लोकांचा शोध घेत, जे लग्नासाठी मुलगी बघत आहेत. विशेषतः श्रीमंत घरांवर या टोळीचे लक्ष असत. त्यानंतर बोलणी झाली, की मंदिरात लग्न केले जाई आणि एका दिवसानंतर लग्न झालेली ही तरुणी, जेवणात गुंगीचे औषध मिसळून घरातील लोकांना बेशुद्ध करत असे. त्यानंतर घरातील पैसे, दागिने व किंमती सामान घेऊन पसार होत.

con bride arrested in Uttar Pradesh
author img

By

Published : Aug 30, 2019, 7:10 PM IST

लखनऊ - लग्नाच्या एका दिवसानंतर, घरातील लोकांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून, घरातील पैसे आणि किंमती सामान घेऊन तरुणी फरार झाली होती. या तरुणीला उत्तर प्रदेश पोलिसांनी एक महिन्यानंतर अटक केली आहे. सोबतच, तिच्या बहिणीलादेखील अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या तरुणीसोबत मोठी टोळी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या टोळीने, कित्येक शहरांमध्ये अशाच प्रकारे लग्न आणि लूट केली आहे. पोलीस आता अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

मुरादाबाद मधील हरथला कॉलनीत राहणाऱ्या संजय नामक तरुणाचे लग्न पूजा नावाच्या तरुणीशी झाले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजाची मावशी तिला भेटण्यास आली आणि रात्री तिथेच मुक्कामी राहिली. दुसऱ्या दिवशी संजय आणि त्याच्या घरच्यांना जाग आल्यानंतर, पूजा आणि तिची मावशी या दोघीही गायब असल्याचे आढळून आले. यासोबतच घरातील रोकड आणि दागिनेही गायब होते. बऱ्याच शोधानंतरही जेव्हा पूजा आणि तिच्या मावशीचा पत्ता लागला नाही, तेव्हा संजयच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी तपास करत पूजा आणि तिच्या बहिणीला बरेली जनपदवरील बहेडी मधून ताब्यात घेतले.

पूजाच्या बहिणीविरूद्ध देखील आग्र्यामध्ये असाच एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि तिची बहीण आपल्या तथाकथित मावशीसोबत मिळून, बऱ्याच काळापासून लोकांना लुटत आहेत. पूजाची मावशी आपल्या टोळीच्या मदतीने अशा लोकांचा शोध घेत, जे लग्नासाठी मुलगी बघत आहेत. विशेषतः श्रीमंत घरांवर या टोळीचे लक्ष असे. त्यानंतर बोलणी झाली, की मंदिरात लग्न केले जाई आणि एका दिवसानंतर लग्न झालेली ही तरुणी, जेवणात गुंगीचे औषध मिसळून घरातील लोकांना बेशुद्ध करत असे. मग, घरातील पैसे, दागिने व किंमती सामान घेऊन पसार होत.

मुरादाबाद मध्ये लग्नाच्या बहाण्याने लूट केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरदेखील वारंवार अशा नव्या टोळ्या सक्रिय होत आहेत. पोलिसांनी लोकांना लग्नाआधी तरुणींबाबत सर्व माहितीची नीट पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

Intro:Body:

Nat

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.