नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर विलगीकरणात राहत असल्याचे दास यांनी टि्वट करून सांगितले आहे. आपण विलगीकरणात राहूनही काम करत राहणार असल्याचे दास यांनी सांगितले.
-
RBI Governor Shaktikanta Das tests positive for #COVID19, says he will continue to work from isolation. pic.twitter.com/Kf6L7wUe4e
— ANI (@ANI) October 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">RBI Governor Shaktikanta Das tests positive for #COVID19, says he will continue to work from isolation. pic.twitter.com/Kf6L7wUe4e
— ANI (@ANI) October 25, 2020RBI Governor Shaktikanta Das tests positive for #COVID19, says he will continue to work from isolation. pic.twitter.com/Kf6L7wUe4e
— ANI (@ANI) October 25, 2020
'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कुठलीही लक्षणे नाहीत. माझी प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. मी विलगीकरणात राहूनही सतत काम करत राहणार आहे. आरबीआयचे सर्व कामे तशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत मी संपर्कात असून काम व्यवस्थित सुरूच राहणार' असल्याचे दास यांनी टि्वट करून सांगितले.