नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्याची कपात करण्यात आली आहे.
शक्तीकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- कोरोनामुळे रेपो आणि रिव्हर्स रेपोमध्ये घट
- रिव्हर्स रेपो रेटमध्ये 90 बेसीक पॉईंटची घट
- रिव्हर्स रेपो दर 4.90 वरुन 4
- रेपो रेट 75 बेसिक पॉईंटची घट
- रेपो रेट 5.15 वरुन 4.4 (व्याजदरात घट) (0.75 टक्का कपात)
- अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरावर घट
- व्याजदर कमी केल्याने हफ्त्याची रक्कम कमी होणार (ईएमआय रक्कम कमी होणार)
- कोरोनाचा अनेक क्षेत्राला मोठा फटका
- कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम
- जीडीपीचे अपेक्षित उद्दीष्ट गाठणे सध्या आव्हानात्मक
- कोरोनामुळे मागणी कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता
- कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता
- सीआरआर कमी करण्याचा निर्णय, बँकांचा सीआरआर ३ टक्क्यांवर यामुळे बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रुपये येणार
- एसएलआर दर ३ टक्के, यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे
- येत्या ३० जूनपर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार (बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी उपाय)
- तीन महिने ईएमआय स्थगित करा, बँकांना सल्ला, सामान्यांना मोठा दिलासा मिळेल