ETV Bharat / bharat

ईटीव्हीची २५ वर्षे : लोकांचे प्रेम, आशीर्वाद मौल्यवान आणि अमूल्य - रामोजी राव

author img

By

Published : Aug 28, 2020, 8:29 AM IST

Updated : Aug 28, 2020, 9:55 AM IST

ईटीव्हीचे प्रसारण सुरू झाल्यापासून तेलगू लोकांसह जगभरातील विविध भाषेच्या लोकांनी या वाहिनीला आपल्या मनात स्थान दिले. श्रोत्यांनी ईटीव्हीला भरभरुन प्रतिसाद दिला. तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद खूप मौल्यवान आणि अनमोल आहेत. या वाहिनीच्या यशात सर्वसामान्य लोकांचा सिंहाचा वाटा आहे.

रामोजी राव
रामोजी राव

हैदराबाद - माध्यम क्षेत्रातील आघाडीच्या ईटीव्ही नेटवर्कने २७ ऑगस्टला आपली २५ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. यानिमित्ताने रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी श्रोत्यांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. ईटीव्हीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ईटीव्हीचे प्रसारण सुरू झाल्यापासून तेलगू लोकांसह इतरही लोकांनी आपले मानले. श्रोत्यांनी ईटीव्हीला खूपच पसंती दिली. तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद खूप मौल्यवान आणि अनमोल आहेत. हा संपूर्ण जगातील सर्वसामान्य लोकांचा विजय आहे. हा गौरव तुमचा आहे, हा इतिहासही तुमचा आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. एखादे लहान मूल जन्माला येते आणि ते आपल्या डोळ्यांसमोर लहानाचे मोठे होते. हा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. गेल्या २५ वर्षांची पाने आपण एक एक करुन पलटून पाहतो, तेव्हा आपल्याला छोट्या-मोठ्या घटनांच्या बातम्यांसह मनोरंजनाने एकापेक्षा एक सरस कार्यक्रम आजही आठवतात. ईटीव्हीवरून प्रसारित होणारा कोणताही कार्यक्रम चांगलाच आणि आरोग्यदायी असला पाहिजे, असे मी ईटीव्ही सुरू झाल्यापासून म्हणत आलो आहे. या निश्चयाला आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे जपले आहे.

रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव

हेही वाचा - 'ईटीव्ही'ला २५ वर्षे पूर्ण; रामोजी फिल्म सिटीत थाटात पार पडला रौप्यमहोत्सवी सोहळा

जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमी नवनवीन प्रयोग करत राहणे गरजेचे आहे. मात्र, सर्वच नवीन गोष्टी करून पाहणे गरजेचे आहेच, असे नाही. त्याने कदाचित नुकसानही होऊ शकते. ईटीव्हीने हे तत्व अनुसरले असून त्यानुसारच वाटचाल सुरू आहे. ईटीव्ही अनेकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग झाला आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि हितचिंतन आम्हाला मिळत आहे.

ईटीव्हीला यशस्वी करण्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. अभिनेता, लेखर, निर्माता, निर्देशक, तांत्रिक तज्ञ, केबल चालक आणि सॅटेलाईट आणि ईटीव्हीचे सर्व कर्मचारी यांचा यात समावेश आहे. या सर्वांनी अथक प्रयत्न केले, म्हणूनच आपण रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करू शकलो. मी पुन्हा एकदा ईटीव्ही परिवाराचे मनापासून आभार मानतो, आणि हा विश्वास देतो की, ईटीव्ही नेहमीप्रमाणेच न थांबता मनोरंजन करतच राहील, असे रामोजी राव म्हणाले.

Last Updated : Aug 28, 2020, 9:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.