ETV Bharat / bharat

भाजप आता राजस्थानातही सरकार स्थापन करू शकते - रामदास आठवले - mp congress

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसची सत्ता बदलल्यानंतर आता भाजपचे लक्ष्य राजस्थानकडे लागले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. आठवले यांनी जयपूरमधील एका कार्यक्रमात भाग घेतला आणि प्रसारमाध्यमांसमोर असे विधान केले की राजस्थानमध्येही भाजप कर्नाटकप्रमाणे सरकार सरकार स्थापन करु शकते. काँग्रेसच्या आमदारांमध्ये राहुल गांधींमध्ये कोणतीही आशा दिसत नाही.

रामदास आठवले
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:55 PM IST

जयपूर - केंद्रीय मंत्री रामदास आठवले शनिवारी राजस्थान दौर्‍यावर होते. दरम्यान जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, "कर्नाटकमधील काही काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर तेथे भाजपने सरकार स्थापन केल्याचे दिसते. आगामी काळात राजस्थानातही अशाच प्रकारची परिस्थिती होण्याची शक्यता आहे."

रामदास आठवले म्हणाले, की "लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ज्याप्रमाणे जनतेने कौल दिला आहे. त्यावरुन असे दिसते की, जनता मोदीसोबत आहे. कर्नाटकचा खेळ पाहिल्यानंतर प्रत्येकाला असे वाटते की, पुढच्या काळात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता नसेल तर, लोक काँग्रेसपासून दूर जात आहेत." ते म्हणाले की, केवळ राजस्थानच नव्हे तर, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि तेथे भाजप सरकार स्थापन करु शकते.

आठवले म्हणाले, "जर अशा पद्धतीने एखादा आमदार पक्षाचा राजीनामा देऊन राजीनामा देतो तर तो त्यांचा घटनात्मक हक्क असून लोकशाहीला कोणताही धोका नाही."

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.