ETV Bharat / bharat

अयोध्या खटला सुनावणी : वकील म्हणाले, 'मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडण्यात आले'

कासव आणि मगर यांच्या नक्षीचे शिलालेख मशिदीच्या अवशेषांवर असून त्याचा मुस्लिम धर्माशी काहीएक संबध नसल्याचे  वकील सी. एस. वैद्यनाथ यांनी म्हणणे मांडले आहे.

सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Aug 20, 2019, 4:44 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या जमीन विवादावरील सुनावणी सुरू आहे. राम मंदिराची बाजू मांडणाऱ्या 'रामलल्ला विराजमान'च्या वकिलांनी बाबरी मशिद बांधण्यासाठी मंदिर पाडण्यात आल्याचा दावा केला. पुरातत्त्व खात्याच्या ( एएसआय) अहवालाचा हवाला देत विवादित जागी मंदिर असल्याचा युक्तीवाद वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी केला.

  • Ayodhya case: Senior advocate CS Vaidyanathan appearing for 'Ram Lalla Virajman' told Supreme Court that disputed structure was put in place either on the ruins of the temple or by pulling down the temple pic.twitter.com/Yg6AC0G0WN

    — ANI (@ANI) August 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'एएसआय'च्या अहवालाचा उल्लेख करताना 'अयोध्येत मशीद बांधण्यासाठी हिंदूंचे मंदिर पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बाबरी मशिद पाडली तेव्हा पुरातत्त्व खात्याच्या अहवालात मशिदीच्या नक्षीकामाचा उल्लेख आहे. कासव आणि मगर यांच्या नक्षीचे शिलालेख मशिदीच्या अवशेषांवर असून त्याचा मुस्लिम धर्माशी काहीएक संबध नसल्याचे वकील सी. एस. वैद्यनाथ यांनी म्हणणे मांडले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली दररोज अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पुरातत्त्व खात्याचा हवाला देत वकिलांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या खंडपीठामध्ये धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण, एस. अब्दुल नजीर, एस. ए बोबडे आहेत.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.