ETV Bharat / bharat

'रामजन्मभूमी' की नवीन 'राम मंदिर'..? - दिलीप अवस्थी

नवीन राममंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनानंतर ५ ऑगस्ट रोजी ५ चांदीच्या फरशा ठेवून पायाभरणी समारंभाचे चिन्हांकन करतील. सुरूवातीला, २५० आमंत्रित या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार होते, परंतु ती कमी करून १२५ वर आणण्यात आली आणि त्यात लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत आणि महंत नृत्यगोपाल दास,जे रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणारे होते, यांचा आमंत्रितांमध्ये समावेश आहे...

Ram Janmabhoomi or new Ram temple?
'रामजन्मभूमी' की नवीन 'राम मंदिर'..?
author img

By

Published : Aug 2, 2020, 7:37 AM IST

हैदराबाद : अयोध्येत उभे रहाणारे नवीन राम मंदिर एक समर्पक प्रश्न समोर येणार आहे.त्याला रामजन्मभूमी मंदिर म्हटले जाईल की नुसते नवीन राम मंदिर संबोधले जाईल..? तज्ञांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे, सुरूवातीला रामजन्मभूमी मंदिर बाबरी मशिदीच्या वास्तुसोबतच भुईसपाट झाले होते. केवळ रामाची मूर्ती वाचवता आली आणि त्यांनंतर ती एका तात्पुरत्या बनवलेल्या मंदिरात प्रार्थनेसाठी ठेवण्यात आली. ६ डिसेंबर, १९९२ रोजी बाबरी उध्वस्त झाल्याच्या परिणामी मूळ गर्भगृह कुठेतरी चिखल आणि कोसळलेल्या ढिगाऱ्यात हरवून गेले.

नवीन राममंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनानंतर ५ ऑगस्ट रोजी ५ चांदीच्या फरशा ठेवून पायाभरणी समारंभाचे चिन्हांकन करतील. सुरूवातीला, २५० आमंत्रित या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार होते, परंतु ती कमी करून १२५ वर आणण्यात आली आणि त्यात लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत आणि महंत नृत्यगोपाल दास,जे रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणारे होते, यांचा आमंत्रितांमध्ये समावेश आहे. ४० किलो चांदीची शिळा नव्या गर्भगृहाच्या जागी तेथे ठेवली जाईल.

याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की गर्भगृह भगवान रामाच्या जन्मभूमीच्या ठिकाणी जे मूळ गर्भगृह असल्याचे मानले जाते, त्याच्याशिवायच तयार केले जात आहे. सर्व पवित्र नद्यांचे पवित्र जल आणले जात जाईल आणि भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभात पवित्र माती वापरली जाईल.

नवीन राममंदिर संकुल निश्चितच चमत्कार असेल. जवळपास १२० एकरावर पसरलेले हे मंदिर जगातील तिसर्या क्रमांकाचे मोठे हिंदू मंदिर असेल. पहिले मंदिर अंगरोक वाट संकुल कंबोडियात आहे आणि दुसरे तमिळनाडूमध्ये तिरूचिरापल्लीमध्ये श्री रंगनाथ स्वामी मंदिर आहे. संकुलात भगवान रामाचे मंदिर मुख्य मंदिर असेल आणि त्याभोवती सिता, लक्ष्मण, भरत आणि हनुमान यांची मंदिरे असतील.

नवीन राममंदिराची रचना स्थापत्यकलेच्या नागराज शैलीतील असेल. त्यात ७६,००० ते ८४,००० चौरस फूट क्षेत्रात मंदिर असेल.मंदिराची रचना १९८३ मध्ये चंद्रकांत सोमपुरा यांनी केली होती. सोमपुरा कुटुंबानेच गुजरातेतील सोमनाथ मंदिराची रचना केली आहे आणि त्यांच्यावर मंदिराचा नमुना तयार करण्याची तसेच नव्या मंदिराचे स्तंभ आणि भिंती कोरण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुरूवातीच्या रचनेत १४१ चौरस फूट उंची होती पण ती १६१ चौरस फुट इतकी वाढवण्यात आली. सोमपुरा यांना मूळ दोन मजले हवे होते परंतु आता ते ३ मजली करण्याची योजना असून त्यामुळे रचना सममितीय होईल. मंदिराला एक मुख्य मोठा घुमट असेल आणि चार लहान घुमट असतील.

मंदिराची ३०० फूट लांबी असेल आणि २८० फूट रूंद असेल आणि त्यात पाच आवारे असतील. गृहमंडप-बंदिस्त आवारातच गर्भगृह असेल. या आवाराचा उपयोग मुख्यतः दैवताच्या दर्शनासाठी उपयोग केला जाईल. याशिवाय, भाविकांना सामावून घेण्यासाठी प्रार्थना मंडप, कीर्तन मंडप, नृत्य मंडप आणि रंग मंडप असतील. कोणत्याही वेळेस या मंडपांची क्षमता ५,००० ते ८,००० भाविकांना सामावून घेण्याची असेल.

राजस्थानातील बंसीपंद वाळूचा दगड वापरून मंदिर बांधले जाईल. किमान १.७५ लाख घनफूट वाळुचा खडक मंदिर बांधण्यासाठी लागणार आहे. मंदिरात २१२ कोरलेले स्तंभ असतील आणि त्यापैकी गेल्या ३० वर्षात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यशाळेत अगोदरच संपूर्ण तयार आहेत. हे स्तंभ कोरण्याचे काम अयोध्येतील कार्यशाळेत चालले आहे. हे स्तंभ दोन टप्प्यांमध्ये जुळवण्यात येतील आणि हिंदू देवता आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांतील रचना त्यावर कोरलेल्या असतील. सध्या बांधकामाचे प्रभारी असलेले आशिष सोमपुरा यांनी सांगितले की मुख्य प्रवेशद्वाराची रचना अशा रितीने केली आहे की कुणीही तेथे उभा असलेला त्या अंतरावरून आतील मूर्ती पाहू शकेल. भगवान राम मंदिर साडेतीन वर्षात पूर्ण होईल,सोमपुरा कुटुंबाला असा विश्वास आहे.

रामलल्ला अर्थातच अत्यंत जल्लोषात आहेत. भूमिपूजनाच्या दिवशी त्यांच्या मूर्तीला ९ मौल्यवान हिऱ्यांनी सजवलेला पोषाख चढवला जाईल. भागवत पहारी यांनी हा पोषाख शिवला असून नवग्रहांचे तो प्रतिनिधित्व करेल.

- दिलीप अवस्थी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.