ETV Bharat / bharat

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लडाख दौऱ्यावर - भारत चीन सीमा वाद

17 जुलैला(शुक्रवार) राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर जाणार आहेत. गलवान व्हॅलीतील हिंसाचारात जखमी झालेल्या सैनिकांशी सिंह चर्चा करणार आहेत. लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे त्यांच्यासोबत असणार आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
author img

By

Published : Jul 15, 2020, 8:07 PM IST

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील भारत- चीन नियंत्रण रेषेवरील तणाव निवळत असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत ते सीमेवरील जवानांशी चर्चा करणार आहेत. संरक्षण मंत्र्यांचा याआधी लडाखला पूर्वनियोजित दौरा होता. मात्र, अचानक पंतप्रधान मोदींशी लडाखला भेट दिली होती. त्यामुळे राजनाथ सिंह यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.

17 जुलैला(शुक्रवार) राजनाथ सिंह लेहला जाणार आहेत. गलवान व्हॅलीतील हिंसाचारात जखमी झालेल्या सैनिकांशी सिंह चर्चा करणार आहेत. 15 जूनला गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहिद झाले होते. तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर चीनबरोबरचे भारताचे संबध तणावपूर्ण झाले आहेत. मात्र, विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर सीमेवरील तणाव कमी झाला असून सैन्य माघारी घेण्यात येत आहे.

राजनाथ सिंह यांच्याबरोबर लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे देखील असणार आहेत. दोघे सीमेवरील फॉर्वर्ड पोस्टला भेटी देणार आहेत. काल(मंगळवार) भारत चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चुशुल सेक्टरमध्ये सविस्तर चर्चा झाली. भारताच्या 14 कॉर्प्सचे कमांडर हरिंदर सिंह आणि चीनच्या तिबेट मिलिटरी जिल्ह्याचे प्रमुख लिऊ लिन यांच्यात चर्चा झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.