ETV Bharat / bharat

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची शीला दीक्षित यांना आदरांजली

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना आदरांजली वाहिली. त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्याशीही त्यांनी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.

राजनाथ सिंह
author img

By

Published : Jul 21, 2019, 11:09 AM IST

नवी दिल्ली - 'शीलाजी यांची देशातील एक काळ गाजवलेल्या राजकीय नेत्यांमध्ये गणना करण्यात येईल. त्यांची राजकीय कारकीर्द कलंकरहित होती,' अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना आदरांजली वाहिली. त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्याशीही त्यांनी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. शीला दीक्षित यांचे शनिवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

दरम्यान, कठुआ येथील उझ येथील पुलाचे उद्घाटन करताना सिंह यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर भर दिला. तसेच, 'जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही,' असे ते म्हणाले.

काश्मीर प्रश्न सोडवणारच

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी 'काश्मीर प्रश्न सोडवणारच. जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही,' अशी गर्जना केली आहे. ते 'उझ पुला'च्या उद्घाटनावेळी बोलत होते. सीमा रस्ता संस्थेने (बीआरओ - बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) हा पूल बनवला आहे.

rajnath singh
राजनाथ सिंह
'काश्मीरचा प्रश्न सोडवला जाईल. जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही. एखाद्याला चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात रस नसेल, तर आपल्या सर्वांना कशा प्रकारचा तोडगा निघेल, याची चांगलीच कल्पना आहे,' असे सिंह यांनी म्हटले.'विविध चळवळी चालवणाऱ्या लोकांना त्या माध्यमातून तोडगा हवा असेल तर, मी त्यांना आपण बसून यावर चर्चा करू, असे आवाहन करतो. यामुळे काय समस्या आणि अडचणी आहेत, हे समजेल आणि त्या मिळून सोडवणे सोपे होईल,' असे ते म्हणाले. उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जम्मू-काश्मीर दहशतवादाच्या धोक्यापासून मुक्त होईल, अशी ग्वाही दिली. 'हे राज्य दहशतवादमुक्त होईल, याबाबत कोणतीही शंका नाही. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी जागतिक समुदाय एकत्र येत आहे,' असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीर आणि जग दहशतवादमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविषयी विचारले असता, 'देशाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि लष्कराचे जवान व अधिकारी यांच्यावरील विश्वासाला तडा जाऊ देऊ नका,' असे ते म्हणाले.'बीआरओने प्रथमच इतका मोठा पूल बनवला असून यामुळे स्थानिक नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. येथील रहिवाशांनी अनेक दिवसांपासून याची मागणी केली होती. मी बीआरओचे अहिनंदन करू इच्छितो,' असे ते म्हणाले. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. तिथे हुतात्मा जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीरभूमी’ला भेट दिली.

Intro:Body:

--------

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची शीला दिक्षित यांना आदरांजली

नवी दिल्ली - 'शीलाजी यांची देशातील एक काळ गाजवलेल्या राजकीय नेत्यांमध्ये गणना करण्यात येईल. त्यांची राजकीय कारकीर्द कलंकरहित होती,' अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना आदरांजली वाहिली. त्यांचे पुत्र संदीप दिक्षित यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. शीला दिक्षित यांचे शनिवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

दरम्यान, कठुआ येथील उझ येथील पुलाचे उद्घाटन करताना सिंह यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर भर दिला. तसेच, 'जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही,' असे ते म्हणाले.

काश्मीर प्रश्न सोडवणारच

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी 'काश्मीर प्रश्न सोडवणारच. जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही,' अशी गर्जना केली आहे. ते 'उझ पुला'च्या उद्घाटनावेळी बोलत होते. सीमा रस्ता संस्थेने (बीआरओ - बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) हा पूल बनवला आहे.

'काश्मीरचा प्रश्न सोडवला जाईल. जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही. एखाद्याला चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात रस नसेल, तर आपल्या सर्वांना कशा प्रकारचा तोडगा निघेल, याची चांगलीच कल्पना आहे,' असे सिंह यांनी म्हटले.

'विविध चळवळी चालवणाऱ्या लोकांना त्या माध्यमातून तोडगा हवा असेल तर, मी त्यांना आपण बसून यावर चर्चा करू, असे आवाहन करतो. यामुळे काय समस्या आणि अडचणी आहेत, हे समजेल आणि त्या मिळून सोडवणे सोपे होईल,' असे ते म्हणाले.

उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जम्मू-काश्मीर दहशतवादाच्या धोक्यापासून मुक्त होईल, अशी ग्वाही दिली. 'हे राज्य दहशतवादमुक्त होईल, याबाबत कोणतीही शंका नाही. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी जागतिक समुदाय एकत्र येत आहे,' असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीर आणि जग दहशतवादमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविषयी विचारले असता, 'देशाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि लष्कराचे जवान व अधिकारी यांच्यावरील विश्वासाला तडा जाऊ देऊ नका,' असे ते म्हणाले.

'बीआरओने प्रथमच इतका मोठा पूल बनवला असून यामुळे स्थानिक नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. येथील रहिवाशांनी अनेक दिवसांपासून याची मागणी केली होती. मी बीआरओचे अहिनंदन करू इच्छितो,' असे ते म्हणाले.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. तिथे हुतात्मा जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीरभूमी’ला भेट दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.