ETV Bharat / bharat

देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो - राजनाथ सिंह

'आमचा शेजारी कधी काय करेल, याची आम्हाला सतत चिंता लागून राहिलेली असते. आम्ही मित्र बदलू शकतो. मात्र, शेजारी बदलू शकत नाही. देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे,' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राजनाथ सिंह
author img

By

Published : Aug 8, 2019, 5:00 PM IST

नवी दिल्ली - भारताने आर्टिकल ३७० रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आणि राज्याचा दर्जाही काढून घेतला. यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी शक्य त्या पद्धतींनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भारताशी असलेले राजनैतिक आणि व्यापारी संबंध नुकतेच संपुष्टात आणले आहेत. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो,' असे म्हणत पाकला टोला लगावला आहे.

'आमचा शेजारी कधी काय करेल, याची आम्हाला सतत चिंता लागून राहिलेली असते. आमची समस्या ही आहे की, आम्ही मित्र बदलू शकतो. मात्र, शेजारी बदलू शकत नाही. एकीकडे शेजाऱ्याची निवड करणे आमच्या हातात नाही आणि दुसरीकडे असा काही शेजारी आमच्या बाजूला आहे की, देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे,' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

  • Defence Min Rajnath Singh:Sabse badi ashanka toh hume hamare padosi ke bare mein rehti hai.Samasya yeh hai aap dost badal sakte hain magar padosi ka chunav aapke haath mein nahi hota hai. Aur jaisa padosi hamare bagal mein baitha hai,paramatma kare ki aise padosi kisi ko na mile. pic.twitter.com/22PQ9aeIec

    — ANI (@ANI) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही भारताशी असलेले संबंध संपवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर टीका केली आहे. 'जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० विषयीचा निर्णय ही आमची देशांतर्गत बाब आहे. यावर पाकने प्रतिक्रिया देण्याचा संबंधच येत नाही. पाकिस्तान जगासमोर विनाकारण कांगावा करून दाखवत आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Intro:Body:

rajnath singh jabs pakistan hope no one gets a neighbour like ours

defence ministrer rajnath singh, rajnath singh jabs pakistan, hope no one gets a neighbour like ours, article 370, jammu kashmir, पाकिस्तान बिथरला

-------------------

देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो - राजनाथ सिंह

नवी दिल्ली - भारताने आर्टिकल ३७० रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आणि राज्याचा दर्जाही काढून घेतला. यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी शक्य त्या पद्धतींनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भारताशी असलेले राजनैतिक आणि व्यापारी संबंध नुकतेच संपुष्टात आणले आहेत. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो,' असे म्हणत  पाकला टोला लगावला आहे.

'आमचा शेजारी कधी काय करेल, याची आम्हाला सतत चिंता लागून राहिलेली असते. आमची समस्या ही आहे की, आम्ही मित्र बदलू शकतो. मात्र, शेजारी बदलू शकत नाही. एकीकडे शेजाऱ्याची निवड करणे आमच्या हातात नाही आणि दुसरीकडे असा काही शेजारी आमच्या बाजूला आहे की, देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे,' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही भारताशी असलेले संबंध संपवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर टीका केली आहे. 'जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० चा निर्णय ही आमची देशांतर्गत बाब आहे. यावर पाकने प्रतिक्रिया देण्याचा संबंधच येत नाही. पाकिस्तान जगासमोर विनाकारण कांगावा करून दाखवत आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.