ETV Bharat / bharat

सुपरस्टार रजनीकांत मायानगरीत दाखल, दरबारच्या शूटींगला सुरुवात

रजनीकांत मुंबईतील वांद्र्यात, दरबार सिनेमाचे शूटींग करतोय....त्याच्या या १६७ व्या सिनेमात तो २५ वर्षानंतर पोलिसाची भूमिका साकारतोय...अभिनेत्री नयनतारा यात लिड रोल करीत आहे....

author img

By

Published : Apr 23, 2019, 7:03 PM IST

दरबारच्या शूटींगला सुरुवात

मुंबई - सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी 'दरबार' चित्रपटाच्या शूटींगला मुंबईत सुरुवात झाली आहे. ए. आर. मुर्गाडोस दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटाच्या शूटींगसाठी आज रजनीकांत मायानगरीत दाखल झाला. वांद्र्यात त्याचे शूटींग सुरू असून मीडियाच्या कॅमेऱ्यात तो कैद झाला.

दरबारच्या शूटींगला सुरुवात

'दरबार' या १६७ व्या सिनेमात रजनीकांत २५ वर्षानंतर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. १९९२ साली 'पंडियान' या तामिळ चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने १९८२ मध्ये 'मुंन्द्रू मुगम' या चित्रपटात पोलिसाची भूमिका केली होती.

दरबार चित्रपटात रजनीकांतसोबत नयनतारा मुख्य भूमिका साकारणार असल्याचे निर्मात्यांनी जाहिर केले आहे. 'चंद्रमुखी' आणि 'कुसेलन' या चित्रपटात नयनताराने रजनीकांतसोबत काम केले होते. आता ती 'दरबार'मध्ये तिसऱ्यांदा काम करणार आहे.

'दरबार' चित्रपटात प्रतिक बब्बर खलनायकाची भूमिका करणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगु भाषेत २०२० मध्ये रिलीज होईल.

Intro:Body:

ent news 04

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.