जयपूर - आज जागतिक योग दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने, जयपूर योगास्थली योगा सोसायटीच्या संचालक आणि फाऊंडर हेमलता शर्मा ही १२ तासांहून अधिक काळ योगा करत विश्वविक्रम नोंदवणार आहे. हेमलता याच्या या योगा प्रात्यक्षिकाचे लाईव्ह प्रक्षेपण फेसबूकवरून करण्यात येत आहे.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकरा माजवला आहे. यामुळे लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अशात कोरोनावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईपर्यंत आपली शारीरिक स्थिती सुदृढ ठेवणे, प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक चांगला उपाय आहे योगासन. योगाने आपण शारिरिक नाही तर मानसिकदृष्या सुदृढ राहतो.
हेमलता ही लॉकडाऊनच्या काळात निरंतर योग अभ्यास करत आहे. योगाच्या माध्यमातून ती नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. तिच्या मते, योगा केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि ती वाढली की आपण सहज कोरोनाला हरवू. ती 'महायोग अभियाना'अंतर्गत लोकांना योगासाठी प्रेरित करत आहेत.
सूर्य नमस्कार, पदहस्तासन, ताडासन, वृक्षासन, वक्रासन, उत्कटासन, त्रिकोणासन, पश्चिमोत्तानासन, पद्मासन, धनुरासन आणि भुजंगासन ही आसने केल्यास आपल्याला कोरोनाला हरवता येऊ शकते, असे हेमलताने सांगितलं. तसेच तिने मानसिक तणाव असेल तर चिन मुद्रा, पृथ्वी मुद्रा, आकाश मुद्रा, सूर्य मुद्रा ही योगासन केल्यास तणाव कमी होईल, असे म्हटलं आहे.
हेही वाचा - International Yoga Day २०२० : जाणून घ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी...
हेही वाचा -'योग हे एकतेचे प्रतिक.. ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही'