जयपूर - राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी सर्व मंत्र्याची बैठक घेतली.
सीएम अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. बैठकीच्या माध्यमातून अशोक गेहलोत यांनी सरकारवर आपली पकड दाखवायचा प्रयत्न केला. परंतु, सचिन पायलटच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नगरविकास व गृहनिर्माण मंत्री शांती धारिवाल, आरोग्यमंत्री रघु शर्मा, परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास व कामगारमंत्री टीकाराम ज्युली यांनी गेहलोत यांची भेट घेतली. काँग्रेसच्या आमदारांव्यतिरिक्त अपक्ष आमदारांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भाजपचे षडयंत्र उघड झाले असून राज्य सरकार पाडण्याचा त्यांचा अजेंडे पूर्ण करण्यात त्यांना यश मिळणार नाही, असे खचिरियावास म्हणाले.
विविध राज्यांतील आमदारांना भाजपने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात, कर्नाटक, गोवा आणि मणिपूरमध्येही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, असे गेहलोत म्हणाले.