ETV Bharat / bharat

राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने जप्त केले 1.25 कोटी रुपये; तिघांना अटक

उदयपूर मध्ये पैशांची देवाण घेवाण होणार असल्याची माहिती स्पेशल ऑपरेशन ग्रुपला मिळाली होती. विकास शर्मा यांच्या नेतृत्वात सीआयडीच्या पथकाने 1 कोटी 25 लाख रुपये रक्कम जप्त केली.

author img

By

Published : Jul 22, 2020, 11:44 AM IST

Special Operation Group Police Officer
स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे पोलीस अधिकारी

उदयपूर- राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने 1 कोटी 25 लाख रुपये जप्त केले आहेत. स्पेशल ऑपरेशन ग्रुप अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या प्रयत्नात झालेल्या घोडेबाजार प्रकरणाची चौकशी करत आहे.

उदयपूर मध्ये पैशांची देवाण घेवाण होणार असल्याची माहिती स्पेशल ऑपरेशन ग्रुपला मिळाली होती. विकास शर्मा यांच्या नेतृत्वात सीआयडीच्या पथकाने ही रक्कम जप्त केली. दोन कारमधून ही रक्कम नेत असताना तिघांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात ही रक्कम जमीनच्या व्यवहारासंबंधी असल्याचे स्पष्ट झाले.

स्पेशल ऑपरेशन ग्रुपने यानंतर हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे पुढील तपासासाठी वर्ग केले आहे.

मागील आठवड्यात स्पेशल ऑपरेशन ग्रुपने कथित ऑडिओ टेप प्रकरणी संजय शर्मा याला अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.