ETV Bharat / bharat

राजस्थानातील सत्तानाट्याला विराम.. काँग्रेसने आवाजी मतदानाने जिंकला विश्वासदर्शक ठराव

राजस्थानातील काँग्रेस सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. सरकारने मांडलेला विश्वासदर्शक ठराव मोठ्या बहुमताने पास झाला आहे. विरोधकांनी अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकाल आमच्या बाजूने लागला, असे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले.

अशोक गेहलोतअशोक गेहलोत
अशोक गेहलोत
author img

By

Published : Aug 14, 2020, 4:22 PM IST

Updated : Aug 14, 2020, 5:05 PM IST

जयपूर - राजस्थानात आज(शुक्रवार) विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेले सत्तानाट्य संपुष्टात आले आहे. गुरूवारी सचिन पायलट आणि बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री गेहलोत यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांमधील वाद मिटल्याचे दिसून येत आहे.

भाजपने काल विधानसभेत अविश्वासदर्शक ठराव मांडण्याची घोषणा केली होती. काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरु असून राज्याचा विकास थांबला आहे, असे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले होते. मात्र, भाजपकडे बहुमताची कमतरता होती. आज अधिवेशनात काँग्रेसने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने गेहलोत यांची खुर्ची शाबूत राहीली.

राजस्थान सरकार आणि काँग्रेसच्या एकतेचा विजय होईल, असे आज सकाळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले होते. सत्याचा विजय होईल, असे ट्विट त्यांनी केले होते. २०० जागा असेलल्या राजस्थान विधासभेत भाजपचे ७२ आमदार आहेत. तर काँग्रेसच्या बाजूने १०७ आमदार आणि अपक्ष आणि पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ आहे.

माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. सरकारने मांडलेला विश्वासदर्शक ठराव मोठ्या बहुमताने पास झाला आहे. विरोधकांनी अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकाल आमच्या बाजूने लागला, असे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले.

सभागृहात बसण्याची जागा बदल्यावरही माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी उत्तर दिले. माझी जागा का बदल्यात आली? यावर मी दोन मिनीटे विचार केला. माझी जागा सरकार आणि विरोधकांतील सीमारेषा आहे. कणखर आणि मजबूत योद्ध्यांना सीमेवर पाठविले जाते, असे सचिन पायलट म्हणाले.

सरकार आमदार खासदारांचे फोन टॅप करतेय ?

विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी सरकार फोन टॅप करत असल्याचा आरोप केला. सरकार स्वत:च्या फायद्यासाठी पोलिसांचा वापर करत आहे. परवानगी घेवून फोन टॅप केला तर समजू शकतो. मात्र, सराकारने परवानगी न घेता आमदार आणि खासदारांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार आणि खासदारांचे फोन टॅप करण्याची संस्कृती राजस्थानात नसून असे काहीही घडले नाही, असे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले. काँग्रेस स्वत:च्या घरातील भांडणामुळे अडचणीत आले आहे. भाजपचे याच्याशी काहीही देणेघेणे नाही, उगाचच आमच्यावर खापर फोडण्यात आले, असे कटारिया म्हणाले.

सरकारचे घोषवाक्य' जाने क्या हो जाये'

विरोधी पक्ष उपनेते राजेंद्र राठोड यांनीही सरकारवर टीका केली. राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाचे घोषवाक्य ' जाने क्या दिख जाये' असे आहे. मात्र, सरकारचे घोषवाक्य 'जाने क्या हो जाये' असे असल्याचा टोला राठोड यांनी काँग्रेसला लगावला.

सभागृहाच्या चर्चेत सध्या मागील काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडींवर चर्चा सुरु आहे. भाजप राजस्थानातील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. तर आमदारांच्या घोडेबाजारावरही चर्चा सुरु आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधकांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Last Updated : Aug 14, 2020, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.