ETV Bharat / bharat

राजस्थानात काँग्रेसच्या सत्ता संघर्षावर चर्चा करण्यासाठी भाजपाची बैठक

भाजपाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव व्ही. सतीश, राज्याचे अध्यक्ष सतीश पुनिया, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया आणि उपाध्यक्ष राजेंद्र राठोड बैठकीला उपस्थित होते. राज्यातील सरकारच्या अस्थिरतेवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 14, 2020, 3:47 PM IST

जयपूर - राजस्थानात सुरू असलेल्या काँग्रेसच्या सत्तापेचावर चर्चा करण्यासाठी भाजपाने आज बैठक बोलावली होती. राज्यातील राजकीय स्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यातील भाजपाच्या मुख्यालयात ही बैठक पार पडली.

उपमुख्यमंत्रीपदावरून सचिन पायलट यांची उचलबांगडी

काँग्रेस विधिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांचे उपमुख्यमंत्रीपद आणि राज्याचे काँग्रेस प्रमुखपद ही दोन्ही पदे काढून घेण्यात आली आहेत. पक्षाने व्हिप (आदेश) जारी करत बंडखोर आमदारांवर कारवाई केली आहे. काँग्रेसने विश्वासू विश्वेद्र सिंह आणि रमेश मीना या दोन्ही नेत्यांना बंडखोरीनंतर राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. राजस्थानच्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदी आता गोविंद सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव व्ही. सतीश, राज्याचे अध्यक्ष सतीश पुनिया, विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया आणि विरोधी पक्ष उपाध्यक्ष राजेंद्र राठोड बैठकीला उपस्थित होते. राज्यातील सरकारच्या अस्थिरतेवर चर्चा सुरू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

काँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांना समर्थन देणाऱ्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. मात्र, ते भाजपामध्ये जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्रीपद नाकारल्यापासून सचिन पायलट नाराज होते. सुमारे 30 आमदार आणि अपक्षांचा पायलट यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. 200 सदस्य असलेल्या राज्य विधासभेत 107 आमदार काँग्रेसचे असून 72 आमदार भाजपाचे आहेत. काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.