राजस्थान- राजस्थान 15 व्या विधानसभेचे पाचवे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. पाचवे अधिवेशन हे सरकारसाठी फार महत्वाचे आहे. दरम्यान, पंजाब नंतर राजस्थान सरकार कृषी कायद्याला विरोध करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कॉंग्रेस पक्ष ज्या शेतीविषयक कायद्याविरोधात देशभर रस्त्यावर आंदोलन करत आहे. आता त्याच कायद्याविरोधात सभागृहात प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.
केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात विधेयक
केंद्राच्या सुधारीक कृषी कायद्याला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये याआधीच या कायद्या विरोध विधेयक सहमत करण्यात आले आहे. पंजाबनंतर राजस्थानमध्येही अशा पद्धतीचे विधेयक मांडले जाईल अशी शक्यता आहे. तसेच या अधिवेशनात शेतकर्यांचे हित जपण्यासाठी राजस्थान सरकार 1960 मधील नागरी प्रक्रिया संहिता बदलून शेतकर्याची 5 एकरांपर्यंतची जमीन संलग्न न करण्यासाठी दुरुस्ती आणेल. तसेच मास्क बाबत देखील विधानसभा अधिवेशनात कायदा आणला जाईल.
प्रश्नोत्तराचा तास होणार नाही
विधानसभेची कार्यवाही सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि पहिल्या दिवशी पाच किंवा त्यापेक्षा अधिक दुरुस्त्या, सरकार करेल. आज होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. तसेच विधानसभेत विधेयके ठेवल्यानंतर, कार्य सल्लागार समितीची बैठक होईल. ज्यामध्ये ही विधेयके मंजूर करण्याचा दिवस निश्चित केला जाईल. शक्यतोर सोमवारी विधानसभेत ही सर्व विधयके संमत केली जातील आणि राज्यपालांना पाठविण्यात येतील.
मास्क बाबत विधानसभा अधिवेशनात कायदा
विधानसभेत कोरोना संसर्गामुळे मास्क वापरण्याबाबतही कायदा आणला जात आहे. आतापर्यंत सरकार जनजागृतीसाठी आणि साथीच्या कायद्यान्वये मास्क घालण्याची सूचना देत आहे. पण आता विधानसभेत मास्क बाबत कायदा केला जाईल. त्यानंतर मास्क न घातल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल.
हेही वाचा- भारतातील पहिली सीप्लेन सेवा सुरू होणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्घाटन
हेही वाचा- 'सत्तेत आल्यास माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना 10 वीची परीक्षा पास करण्यासाठी मदत करू'