जयपूर - राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय महासंग्रामात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी (दि. 30 जुलै) सर्व आमदारांना विधानसभा सत्र सुरू होईपर्यंत हॉटेल फेयरमाउंटमध्येही थांंबण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री गहलोत हे आमदारांना संबोधित करत म्हणाले, आपली एकजुटीच हेच आपला विजय आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्री गहलोत यांना जोपर्यंत राजकीय धोका टळत नाही तोपर्यंत आम्ही याच हॉटेलमध्ये राहण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.
सण-उत्सवही होणार हॉटेलात साजरा
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 14 ऑगस्टपर्यंत सर्व आमदारांना हॉटेल फेयरमाउंटमध्येच मुक्काम करण्यास सांगितले आहे. या दरम्यान, 1 ऑगस्टला बकरी ईद, 3 ऑगस्टला रक्षाबंधन आणि 12 ऑगस्टला जन्माष्टमी आहे. यामुळे हे सर्व सण याच हॉटेल फेयरमाउंट मध्ये साजरे केले जाणार आहे. सणाच्या दिवशी आमदारांना आपल्या कुटुंबीयांना हॉटेलात आणण्याची मुभा देण्यात आली आहे.
आतापर्यंत 70 आमदारांचे कुटुंबीय हॉटेल फेयरमाउंट मध्ये येत-जात असतात. 20 हून अधिक आमदारांचे कुटुंबीय याच हॉटेलात वास्तव्यास आहेत.