नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकेलल्या कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. यानुसार शनिवारी कामगारांसाठी आंतरराज्यीय १६० विशेष श्रमिक ट्रेन धावल्या. या माध्यमातून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यास मदत झाली. शुक्रवारी जवळपास १६७ रेल्वेगाड्या कामगारांसाठी उपलब्ध होत्या. एका श्रमिक विशेष गाडीमध्ये जवळपास १२०० प्रवासी असतात. यामुळे जवळपास २.३९ लाख कामगार आतापर्यंत या रेल्वेच्या माध्यमातून घरी पोहोचले आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने जारी केली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. परराज्यातील कामगारांची यादी बनवा. तसेच त्यांना कुठे जायचे आहे, याबाबत सविस्तर तपशील रेल्वे विभागाकडे पोहोचवा, अशा सूचना गोयल यांनी दिल्या आहेत. ३०० विशेष श्रमिक रेल्वे एका दिवसात धावण्याची भारतीय रेल्वेची मर्यादा आहे.