नवी दिल्ली - दिल्लीमध्ये असलेल्या रेल्वे मंत्रालयाच्या मुख्यालयात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे 'रेल भवन' पुढील दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आर.पी.एफ) मध्ये क्लर्क पदावर काम करणारा व्यक्ती 6 मेपासून विलगीकरणात होता. हा व्यक्ती रेल भवनच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या डिरेक्टर जनरल अरुण कुमार यांच्या कार्यालयात काम करत असे.
या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच, बुधवारी इमारत निर्जंतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेसाठी १४ आणि १५ मे हे दोन दिवस रेल भवनची इमारत बंद राहणार आहे.
हेही वाचा : सामान्य नागरिकांनाही आता सैन्यात सहभागी होण्याची संधी; लष्कराने मांडला प्रस्ताव