ETV Bharat / bharat

'जगातील कोणतीही ताकद मला रोखू शकत नाही', राहुल गांधी हाथरसला रवाना - हाथरस लेटेस्ट न्यूज

राहुल गांधी यांनी आज टि्वट करून हाथरसला जाण्याविषयी माहिती दिली. जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही, असे त्यांनी टि्वट करून म्हटले आहे. यापूर्वीही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखले होते.

राहुल गांधी-योगी
राहुल गांधी-योगी
author img

By

Published : Oct 3, 2020, 2:52 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ आज उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी रवाना झाले आहे. जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही, असे त्यांनी टि्वट करून म्हटले आहे. यापूर्वीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखले होते. तसेच यावेळी राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती.

  • दुनिया की कोई भी ताक़त मुझे हाथरस के इस दुखी परिवार से मिलकर उनका दर्द बांटने से नहीं रोक सकती।

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी यांनी आज टि्वट करून हाथरसला जाण्याविषयी माहिती दिली. उत्तर प्रदेश प्रशासन आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबाशी ज्याप्रकारे वर्तन केले आहे. ते मला मान्य नाही. कोणत्याही भारतीयाने ती स्वीकारू नये. जगातील कोणतीच शक्ती मला हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्यापासून रोखू शकत नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. या टि्वटमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना इशारा दिला आहे.

तथापि, हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यात आणि संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. यातच योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.