ETV Bharat / bharat

नागपूरचे 'निकरवाले' तमिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही - राहुल गांधी

author img

By

Published : Jan 25, 2021, 1:47 PM IST

Updated : Jan 25, 2021, 3:12 PM IST

काँग्रेस खासदार राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱयावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नागपूरचे 'निकरवाले' ( आरएसएस पोषाखावरून टीका ) तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही, असे ते म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी

चैन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुका यंदा पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱयावर आहेत. राज्यात विविध ठिकाणी रोड शो व सभांद्वारे ते भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. रविवारी राहुल गांधींनी एका सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपावर जोरदार टीका केली. नागपूरचे 'निकरवाले' ( आरएसएस पोषाखावरून टीका ) तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही. तामिळनाडूचे भविष्य फक्त राज्यातील तरुण आणि लोकचं ठरवू शकतात, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समजू शकत नाहीयेत की, तामिळनाडूचे भविष्य हे फक्त तामिळानाडूचे लोकचं ठरवू शकतात. तामिळ नागरिकांना मदत करण्यासाठीच मी येथे आलो आहे. नागपूरचे निकरवाले तामिळनाडूचे भविष्य ठरवू शकत नाहीत. तामिळनाडूमध्ये त्यांनी कितीही परेड घेतल्या तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही, असे राहुल म्हणाले.

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरूनही मोदींवर निशाणा साधला. मोदींनी यांनी लागू केलेले शेतकरी कायदे हे शेतकरी आणि कामगारविरोधी आहेत. मी मोदींना देशाचा भारताचा पाय नष्ट करू देणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी चीनवरून मोदींवर निशाणा साधला. चीनने भारताची जमीन बळकावली आहे. मात्र, यावर मोदींनी मौन बाळगलयं, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी 'मन की बात' वरून मोदींवर टीका केली. मी येथे काय करावे हे सांगण्यासाठी आलो नाही किंवा 'मन की बात' बद्दल तुमच्याशी बोलण्यासाठी आलो नाही. मी आपल्या समस्या ऐकण्यासाठी आणि निराकरण करण्यात मदत करण्यासाठी आलो आहे, असेही ते म्हणाले.

तामिळनाडू विधानसभा निवडणूक -

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठपल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष आता कसून तयारीला लागले आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणूक 16 मे 2016 ला पार पडली होती. या निवडणुकीमध्ये तामिळनाडू विधानसभेमधील सर्व 234 जागांसाठी मतदान घेण्यात आले. जयललिताच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाने 136 जागांसह बहुमत मिळवून सत्ता राखली. दर पाच वर्षांनी सत्तांतरण होणाऱ्या तामिळनाडूमध्ये सत्ताधारी राजकीय पक्षाने बहुमत राखल्याची 1984 नंतर ही पहिलीच वेळ होती. द्रमुक पक्षाने मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले परंतु बहुमत मिळवण्यात द्रमुकला अपयश आले. जयललिता यांनी लढवलेली ही अखेरची निवडणूक होती. डिसेंबर 2016 मध्ये आजारपणामुळे जयललिता ह्यांचे निधन झाले व ओ. पन्नीरसेल्वम तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.

Last Updated : Jan 25, 2021, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.