ETV Bharat / bharat

वरिष्ठ काँग्रेस नेत्यांकडून राम मंदिर उभारणीचे स्वागत, शिलान्यासानंतर सावध पवित्रा - राहुल गांधी न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी करताना ‘मंदिर वहीं बनायेंगे’ हे भाजपने सत्तेवर येण्यासाठी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा पहिला टप्पा गाठला आहे. दरम्यान, नेहमीच धर्मनिरपेक्षतेचा उपदेश करणार्‍या आणि राम कार्ड खेळण्याच्या भाजपच्या राजकारणापासून सावध राहिलेल्या काँग्रेसने राम मंदिराच्या बांधकामाचे सावधगिरीने स्वागत केले. या विषयावरील आपल्या दशकांपासूनच्या जुन्या भूमिकेत आता बदल केले आहेत. जेणेकरून यापुढे हिंदूंच्या भावनांचे विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ नये.

राहुल गांधी न्यूज
राहुल गांधी न्यूज
author img

By

Published : Aug 5, 2020, 7:27 PM IST

नवी दिल्ली - अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यावेळी उपस्थित होते. भूमिपूजन सोहळा पार पडताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत त्यांचं मौन सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, “मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोत्कृष्ट मानवी गुणांचे मूर्त स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर रुजलेल्या मानवतेची मूळ भावना आहे.

‘राम प्रेम आहे. तो कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करुणा आहे. तो कधी क्रूर असू शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नेहमीच धर्मनिरपेक्षतेचा उपदेश करणार्‍या आणि राम कार्ड खेळण्याच्या भाजपच्या राजकारणापासून सावध राहिलेल्या काँग्रेसने राम मंदिराच्या बांधकामाचे सावधगिरीने स्वागत केले. या विषयावरील आपल्या दशकांपासूनच्या जुन्या भूमिकेत आता बदल केले आहेत. जेणेकरून यापुढे हिंदूंच्या भावनांचे विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ नये.

अनेकांप्रमाणेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभारी आणि पक्षासाठी संकटमोचक ठरलेल्या प्रियांका गांधी यांनीही राम मंदिर उभारणीला समर्थन देणारे ट्विट केले होते. बुधवारी होणाऱ्या राम मंदिर शिलान्यास सोहळ्याआधी मंगळवारी प्रियांका यांनी ‘या सोहळ्याकडे राष्ट्रीय ऐक्य, बंधुत्व आणि सांस्कृतिक आत्मीयता वाढवणारा म्हणून पाहता येईल,’ असे ट्विट केले होते.

'भगवान राम हे त्याग तसेच आश्रयाचे प्रतीक आहेत. राम शबरी आणि सुग्रीव या दोघांचे आहेत. राम वाल्मिकी तसेच 'भासा'चेही आहेत. राम 'कांबां'चे आहेत एझुठाचन यांचेही. राम हे कबीर, तुलसीदास आणि रैदास यांचेही आहेत. राम आपल्या प्रत्येकातील चेतना आहेत,' असे त्या म्हणाल्या

सर्वांवरून पक्षाची सद्यस्थिती लक्षात येते. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 1992 साली राजीव गांधी जिवंत असते तर, बाबरी मशीद पाडता आली नसती,' असे वक्तव्य केले होते.

2007 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला की, भगवान राम यांची ऐतिहासिक आणि वैज्ञानिक आधार नाही. त्यांची सत्यता पडताळता येत नाही. त्यानंतर, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले आणि अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र करणे ही काँग्रेसची सर्वांत मोठी 'गंभीर चूक' असल्याचे म्हटले.

आता, 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयात केंद्राची बाजू मांडणारे काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ट्विट करत ‘हा विश्वासाचा मुद्दा असल्याचे' म्हटले आहे. 'इतिहासात काही क्षण हे दैवी लिखित बीजे आहेत, ती भविष्यात आपल्या देशाची वाटचालीची मार्गदर्शक ठरतील’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी ‘रघुपती राघव राजा राम’ हे प्रसिद्ध भजन रामभक्त आणि देशवासियांना राम मंदिर उभारणीबद्दल शुभेच्छा देताना ट्विट केले आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, ‘भगवान श्रीराम सर्वांसाठी न्याय, नीतिमान आचरण, सर्व व्यवहारांमध्ये नीतिमत्ता आणि दृढता, नैतिक वागणूक आणि धैर्य यांचे प्रतीक आहेत. सध्या कठीण काळामध्ये या मूल्यांची जास्त गरज आहे. जर ते सर्वत्र पसरले तर, ’रामराज्य' हा विजयी कट्टरपंथियांचा सण ठरणार नाही. "

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भूमिपूजनाच्या ठीक एक दिवस आधी भोपाळ येथील त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसाची प्रार्थना केली. त्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी 11 चांदीच्या विटा पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या कृतीकडे राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

मात्र, काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या ट्वीटच्या मालिकेत भूमिपूजनावर विरोधाभासी टीका केली आहे. ‘भाजपच्या काही नेत्यांवर झालेला कोरोना विषाणूचा हल्ला हा अयोध्येतील समारंभासाठी मुहूर्त निवडताना सनातन धर्माकडे लक्ष न देण्याचा परिणाम होता,’ असे त्यांनी म्हटले आहे

छत्तीसगडमधील काँग्रेसप्रणित सरकारनेही भगवान राम यांच्याशी संबंधित असलेल्या विविध धार्मिक स्थळांच्या विकासाची योजना जाहीर केली. त्यात चांदखुरी (भगवान राम यांचे आजोळ), तुर्तुरिया (लव-कुशांचे जन्मस्थान) आणि शिवरीनारायण परिसर- जेथे भगवान राम यांनी माता शबरीने दिलेली बोरे खाल्ली होती या ठिकाणांचा समावेश आहे.

‘मंदिर वहीं बनायेंगे’ हे भाजपने सत्तेवर येण्यासाठी दिलेले आश्वासन पाळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पक्षाला सत्तेच्या उंचीवर नेणाऱ्या राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली. यासोबतच भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा पहिला टप्पा गाठला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.