ETV Bharat / bharat

'भाजप सरकारने अनेक घरे उद्धवस्त केली' राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

author img

By

Published : Nov 9, 2020, 2:39 PM IST

तेलंगाणामधील विद्यार्थीनीच्या आत्महत्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. जाणूनबुजून केलेल्या नोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे भाजप सरकारने अनेक घरे उद्धवस्त केली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी

हैदराबाद - प्रतिष्ठित श्रीराम कॉलेजमधील एका 19 वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केली. ऐश्वर्या रेड्डी असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शिक्षण घेण्यात आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने आत्महत्या केल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जाणूनबुजून केलेल्या नोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे भाजप सरकारने अनेक घरे उद्धवस्त केली आहेत. हेच सत्य आहे, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली आहे.

  • इस अत्यंत दुखद घड़ी में इस छात्रा के परिवारजनों को मेरी संवेदनाएँ।

    जानबूझकर की गयी नोटबंदी और देशबंदी से भाजपा सरकार ने अनगिनत घर उजाड़ दिए।

    यही सच्चाई है। pic.twitter.com/TX5vG40fPC

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी ऐश्वर्या रेड्डी या तरुणीचे वडील मेकॅनिक होते. ऐश्वर्याचे आयएसएस होण्याचे स्वप्न होते. मात्र,वडिलांकडे तितके पैसे नव्हते. लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणसाठी ते तिला ल‌ॅपटॉप घेऊन देऊ शकले नाही. शिक्षण घेता येत नसल्याने 2 नोव्हेंबरला ऐश्वर्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. माझ्यामुळे आई-वडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुटुंबावर माझे ओझे झाले आहे. माझे शिक्षण एक ओझे झाले आहे. जर मी शिक्षण घेऊ शकत नाही. तर माझी जगण्याची इच्छा नाही, असे ऐश्वर्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

विश्वासघात दिवस

नोटाबंदी, लॉकडाऊनवरून राहुल गांधी केंद्र सरकारला सतत लक्ष्य करत आहेत. रविवारी नोटाबंदीला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडून विश्वासघात दिवस पाळण्यात आला. मोदींनी नोटाबंदीच्या माध्यमातून आपल्या मित्रांचे खिसे भरले आहेत. नोटाबंदी ही चूक झाली नव्हती तर जाणूनबुजून केली होती, असेही टि्वट त्यांनी केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला रविवारी चार वर्षं पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती.

हेही वाचा - 'चार वर्षानंतर नोटबंदीचं काय झालं ? पंतप्रधानांनी कागदोपत्री सांगावे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.