नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी पीडितीचे मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
-
ये सब सिर्फ़ दलितों को दबाकर उन्हें समाज में उनका ‘स्थान’ दिखाने के लिए UP सरकार की शर्मनाक चाल है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
हमारी लड़ाई इसी घृणित सोच के ख़िलाफ़ है।#HathrasHorrorShocksIndia pic.twitter.com/b6Gym5HbUd
">ये सब सिर्फ़ दलितों को दबाकर उन्हें समाज में उनका ‘स्थान’ दिखाने के लिए UP सरकार की शर्मनाक चाल है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 30, 2020
हमारी लड़ाई इसी घृणित सोच के ख़िलाफ़ है।#HathrasHorrorShocksIndia pic.twitter.com/b6Gym5HbUdये सब सिर्फ़ दलितों को दबाकर उन्हें समाज में उनका ‘स्थान’ दिखाने के लिए UP सरकार की शर्मनाक चाल है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 30, 2020
हमारी लड़ाई इसी घृणित सोच के ख़िलाफ़ है।#HathrasHorrorShocksIndia pic.twitter.com/b6Gym5HbUd
दलितांचा आवाज दाबून, दलित समाजाला त्यांचे स्थान दाखवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची ही लज्जास्पद चाल आहे. आमचा लढा या द्वेषपूर्ण विचाराविरुद्ध आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
भारतातील एका मुलीवर बलात्कार केला जातो, वस्तुस्थिती दडपली जाते आणि शेवटी अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही तिच्या कुटुंबाकडून काढून घेण्यात आला. हे निंदनीय आणि अन्यायकारक आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरुणीला मारून टाकले, असे म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली होती. तसेच प्रियंका गांधी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याचीही मागणीही त्यांनी केली आहे.