ETV Bharat / bharat

प्रियांकांकडून मोदींना राष्ट्रवादाचे धडे; जाहिरातींसाठी पैसा आला कुठून, राहुलचा सवाल

author img

By

Published : Apr 15, 2019, 5:31 PM IST

उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथे आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते.

काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी

लखनौ - 'ज्याप्रकारे प्रियांकाजींनी सांगितले की, आज टीव्ही सुरू करा पंतप्रधान मोदी दिसतात, रेडिओ सुरू करा मोदी दिसतात, रस्त्यावर फिरायला गेलो तरी मोदीच दिसतात. इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यासाठी पैसा आला कुठून?, असा सवाल करत काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली. ते उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते.

आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणे सुरू केले आहे. माझे असे स्वप्न आहे की याचप्रकारचे काम उत्तर प्रदेशातही सुरू व्हावे, असे राहुल म्हणाले. आम्ही तिन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांना सर्व जिल्ह्यात 'फूड प्रोसेसिंग युनिट' सुरू करण्यास सांगितले असल्याचेही राहुल म्हणाले. ज्याठिकाणी बटाट्यांचे उत्पादन घेतले जाते तिथेच चिप्स बनवण्याच्या कंपनी सुरू करण्यात येतील. जिथे टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते तिथे टोमॅटो केच-अपची कंपनी सुरू करण्यात येईल. शेतकरी त्यांचे उत्पादन सरळ कंपनीत विकू शकतील, असेही राहुल म्हणाले.

..तर पाकिस्तानविषयी नाही तर हिंदुस्तानविषयी बोला - प्रियांका

प्रियांका गांधी यांनीही भाजप आणि मोदींवर टीका केली. तुम्ही स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवता. जर तुम्ही राष्ट्रवादी आहात तर निवडणुकांच्या वेळी पाकिस्तानविषयी नाही तर हिंदुस्तानविषयी बोला. तुम्ही राष्ट्रवादी आहात तर शेतकरी, तरूण आणि जवानांविषयी बोला, असेही प्रियंका म्हणाल्या. पंतप्रधान मोदी जर तुम्ही राष्ट्रवादी आहात तर अनवाणी तुमच्या दारापर्यंत चालत आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही का भेटले नाहीत?, असा सवाल करत प्रियंकांनी मोदींवर हल्लाबोल केला. तुमच्या सोबतच्या व्यक्तीने महिलांविरोधात वक्तव्य केले तर तुम्ही त्यांना या देशाची संस्कृती का शिकवली नाही, असे अनेक सवाल करत प्रियांकांनी टीकास्त्र सोडले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.