ETV Bharat / bharat

'आमचा सनी हरवला' पठाणकोटमध्ये लागले पोस्टर्स - Gurdaspur constituency

प्रसिद्ध सिनेअभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या विरोधात आमचा खासदार सनी देओल हरवला आहे, अशा आशयाचे पोस्टर पठाणकोटमध्ये लागले आहेत.

'आमचा सनी हरवला' पठाणकोठमध्ये लागले पोस्टर्स
'आमचा सनी हरवला' पठाणकोटमध्ये लागले पोस्टर्स
author img

By

Published : Jan 13, 2020, 10:32 AM IST

नवी दिल्ली - प्रसिद्ध सिनेअभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या विरोधात आमचा खासदार सनी देओल हरवला आहे, अशा आशयाचे पोस्टर पठाणकोटमध्ये लागले आहेत. गुरुदासपूरमध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सनी देओल यांनी एकदाही मतदारसंघाचा दौरा केला नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सनी देओल यांना लक्ष करणारे पोस्टर्स अज्ञातांनी ठिकठिकाणी लावले आहेत. सध्या या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘आमचे खासदार सनी देओल हरवले असून त्यांना शोध सुरू आहे, अशा आशयाची ही पोस्टर्स रेल्वेस्टेशन पासून तर चौकाचौकात लावली आहेत. सनी देओल बऱ्याच दिवसांपासून आमच्या भागात फिरकले नाहीत. हे पोस्टर्स पाहून तरी त्यांना खासदारकीची आठवण येईल, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे.
सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. देओल यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखर यांच्याविरोधात ही निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांचाच ८० हजार मतांनी पराभव केला होता. यापूर्वी गुरुदासपूर येथून भाजपचे उमेदवार अभिनेते-राजकारणी विनोद खन्ना खासदार होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर या जागेसाठी भाजपा नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. तो त्यांना सनी देओल यांच्या रुपाने मिळाला.

Intro:Body:

'आमचा सनी हरवला' पठाणकोठमध्ये लागले पोस्टर्स

नवी दिल्ली -    प्रसिद्ध सिनेअभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या विरोधात आमचा खासदार सनी देओल हरवला आहे, अशा आशयाचे पोस्टर पठाणकोटमध्ये लागले आहेत. गुरुदासपूरमध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सनी देओल यांनी एकदाही मतदारसंघाचा दौरा केला नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सनी देओल यांना लक्ष करणारे पोस्टर्स अज्ञातांनी ठिकठिकाणी लावले आहेत. सध्या या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘आमचे खासदार सनी देओल हरवले असून त्यांना शोध सुरू आहे, अशा आशयाचे ही पोस्टर्स  रेल्वेस्टेशन पासून तर चौकाचौकात फिरत आहेत. सनी देओल बऱ्याच दिवसांपासून आमच्या भागात फिरकले नाहीत. हे पोस्टर्स पाहून तरी त्यांना खासदारकीची आठवण येईल, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे.

सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. देओल यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखर यांच्याविरोधात ही निवडणूक लढवली होती. तसेच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांचाच ८० हजार मतांनी पराभव केला होता. यापूर्वी गुरुदासपूर येथून भाजपाचे उमेदवार अभिनेते-राजकारणी विनोद खन्ना खासदार होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर या जागेसाठी भाजपा नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. तो त्यांना सनी देओल यांच्या रुपाने मिळाला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.