ETV Bharat / bharat

पंजाब सरकारसमोर नवे संकट, मजूर नसल्याने धान्य बाजारपेठ ओस

author img

By

Published : Apr 17, 2020, 11:51 AM IST

गहू खरेदीच्या दुसर्‍या दिवशी जालंधर फूड डेपोमध्ये फक्त एक शेतकरी आपला गहू साठा घेऊन आला. यावेळी या शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी बाजार समितीचे अधिकारी शेतकऱ्याच्या स्वागतासाठी त्याठिकाणी उपस्थित राहिले.

पंजाब सरकारसमोर नवे संकट
पंजाब सरकारसमोर नवे संकट

चंदीगढ - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी पंजाब सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मात्र, अशातच मुख्यमंत्री अमरींदर यांच्यासमोर आता नवे आव्हान उभे ठाकले आहे. पंजाबमध्ये 15 एप्रिलपासून सुरळीत गहू खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यासाठी ना सरकार पूर्णपणे तयार आहे आणि ना शेतकरी.

गहू खरेदीच्या दुसर्‍या दिवशी जालंधर फूड डेपोमध्ये फक्त एक शेतकरी आपला गहू साठा घेऊन आला. यावेळी या शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी बाजार समितीचे अधिकारी शेतकऱ्याच्या स्वागतासाठी त्याठिकाणी उपस्थित राहिले.

गहू पिकाची काढणी व उचलणी करण्यासाठी योग्य ती व्यवस्था असल्याचा सरकार दावा करीत आहे. पण प्रत्यक्षात शेतकरी, मालक आणि अगदी वर्कशॉप मजूर यांची मात्र कोंडी होत आहे. राज्यातील शेतकरी मागणी करत आहेत, की राज्य सरकारने इतर राज्यातील मशीन आणि कामगारांना पंजाबमध्ये येण्यास परवानगी द्यावी. जेणेकरुन गहू काढणी आणि विक्री व्यवस्थित आणि वेळेवर होईल. सोबतच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.