ETV Bharat / bharat

'भारत बंद आंदोलन' ; कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Punjab farm bill protest

मोदी सरकारने पारित केलेल्या कृषि विधेयकाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी 'भारत बंद' आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले आहे.

Punjab CM appeals to farmers to maintain law and order
'भारत बंद आंदोलन' ; कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
author img

By

Published : Sep 25, 2020, 7:53 AM IST

Updated : Sep 25, 2020, 9:05 AM IST

चंदिगड - कृषी विधेयकांविरोधात पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. यासाठी आज (25 सप्टेंबर) 'भारत बंद'ची हाक देण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना काळातील नियमांचे पालन करण्याबाबतही त्यांनी सूचित केले आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणारे अधिकृत पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी कृषि विधेयक दुरुस्तीचा विरोध केला असून शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कलम 144 अंतर्गत कोणावरही कारवाई होणार नसल्याचे सांगितले. मात्र बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून मास्क घालण्याची विनंतीही केली आहे.

पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. अशा पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे मुख्यमंत्री सिंग म्हणाले.

लोकसभा आणि राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे देशभरात विविध पातळीवर परिणाम जाणवले. ठिकठिकाणी शेतकरी या विधेयक दुरुस्तीला विरोध दर्शवत आहेत. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (25 सप्टेंबर) रोजी देशव्यापी 'भारत बंद' आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Last Updated : Sep 25, 2020, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.