पुणे - पुण्याहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावले. उड्डाणाच्या तयारीत असताना वैमानिकाला धावपट्टीवर अचानक एक जीप दिसली. जीपला वाचवण्याच्या प्रयत्नात विमान लवकर हवेत नेण्याचा प्रयत्न वैमानिकाने केला. मात्र, कमी वेग असल्याने विमानाचा शेपटाकडील भाग जमीनीला घासला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
-
Indian Air Force officials: Due to the presence of the vehicle near the runway, the Air India pilot had to do an earlier rotation, than what was planned by the crew of the aircraft. The Air India aircraft has landed safely in Delhi. The matter is under investigation by IAF. (2/2) https://t.co/hWqKWp7EN2
— ANI (@ANI) February 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Indian Air Force officials: Due to the presence of the vehicle near the runway, the Air India pilot had to do an earlier rotation, than what was planned by the crew of the aircraft. The Air India aircraft has landed safely in Delhi. The matter is under investigation by IAF. (2/2) https://t.co/hWqKWp7EN2
— ANI (@ANI) February 15, 2020Indian Air Force officials: Due to the presence of the vehicle near the runway, the Air India pilot had to do an earlier rotation, than what was planned by the crew of the aircraft. The Air India aircraft has landed safely in Delhi. The matter is under investigation by IAF. (2/2) https://t.co/hWqKWp7EN2
— ANI (@ANI) February 15, 2020
उड्डाणावेळी विमानाचा वेग जास्त असताना वैमानिकाला धावपट्टीवर अचानक एक व्यक्ती आणि जीप दिसली. त्यामुळे वैमानिकाने लवकर उड्डाणासाठी प्रयत्न केल्याचे पुणे येथील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. धावपट्टीवरील जीप आणि व्यक्ती विमानतळावरील कर्मचारी होते. काम करत असताना ते धावपट्टीवर आले. उड्डाणावेळी विमानाचा वेळ २०० किमी प्रति तासापेक्षा जास्त असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
उड्डान घेण्यात विमान यशस्वी झाल्याने मोठा अपघात टळला. दिल्लीला विमान पोहोचल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ही घटना पुणे विमानतळावर घडली. नागरी उड्डाण विभागानेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
एअर इंडिया- ८५२ असे अपघातातून वाचलेले विमान आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी असताना ही घटना घडली. चौकशी पूर्ण होईपर्यंत विमानातील कर्मचाऱ्यांना सेवेवरून दूर केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.