नवी दिल्ली - दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात सीएए, एनआरसी विरोधात मागील तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, आता आंदोलनाचा जोर कमी झाला आहे. तंबू उभारून विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. आता यातील अनेक तंबू रिकामे झाले आहेत. मात्र, अजूनही रस्त्याची एक बाजू आंदोलनामुळे बंद आहे.
गेट नंबर ७ वर सुरू आहे आंदोलन
सीएए कायदा मंजूर झाल्यानंतर जामिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. गेट नंबर ७ वर सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला स्थानिक महिला आणि पुरुषांनीही पाठिंबा दिला आहे. एका बाजूने रस्ता बंद असला तरी दुसऱ्या बाजूने वाहतून सुरळीत सुरू आहे. मात्र, आता आंदोलनाला तीन महिने होत आल्याने प्रतिसाद पहिल्यापेक्षा कमी झाला आहे.
हेही वाचा - COVID -19 : कर्नाटकात गेला देशातील पहिला बळी; एकूण रुग्णांची संख्या ७७ वर..
सीएए विरोधी आंदोलनादरम्यान जामिया विद्यापीठात हिंसाचारही घडला होता. ग्रंथालयात बसलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर शंका घेण्यात आली होती. अनेक गाड्या यावेळी जाळण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.