ETV Bharat / bharat

भाड्याच्या घरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर छापा; ६ युवतींसह २४ जणांना अटक - raid

६ युवती आणि १८ आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून हे सर्वजण आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते.

भाड्याच्या घरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर छापा
author img

By

Published : May 27, 2019, 10:32 AM IST

नवी दिल्ली (गुरुग्राम) - शहरातील एका भाड्याच्या घरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत ६ युवतींसह २४ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी छापा मारला तेव्हा हे सर्वजण आक्षेपार्ह स्थितीत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई गुरुग्राम पोलिसांच्या दुर्गा शक्ति महिला रॅपिड अॅक्शन फोर्स आणि सेक्टर-56 च्या टीमने संयुक्तपणे केली. माहितीनुसार, दुर्गा शक्ति महिला रॅपिड अॅक्शन फोर्समध्ये कार्यरत महिला निरीक्षक राजबाला यांना सुत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार घर क्रमांक ए-160, सुशांत लोक, सेक्टर-57, फेस-3, गुरुग्राममध्ये राजीव यादव नावाच्या व्यक्तीने एक घर भाड्याने घेतले आहे. ज्यामध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली. गुरमीत सिंह नावाचा व्यक्ती याठिकाणी अवैधपणे मुली घेऊन येतो आणि हरीश या व्यक्तीकरवी त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत होता. यावेळी भोजराम हा बाहेर रखवालीचे काम करत असे.

रेडिंग पोलीस टीमने याठिकाणी छापा मारला. यात त्यांनी 6 युवती आणि १८ आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या सर्वांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात सेक्टर-56 कलम 3, 4, 5, 7 आणि 8 अनैतिक व्यापार निवारण नियम-1956 च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body:

Delhi news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.