श्रीनगर - स्थलांतरित काश्मिरी पंडितांच्या एका समूहा ‘काश्मीर युवा चळवळी’तर्फे (केवायएम) श्रीनगरमध्ये एलजीबीटी समुदायाच्या समर्थनार्थ जून महिन्यात मार्च आयोजित केला होता. मात्र, कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हा मार्च रद्द करण्यात आला. मात्र, सोशल मीडियावर या विचाराचे समर्थक आणि विरोधक यांच्यादरम्यान जोरदार वादावादी झाली.
हा समूह (केवायएम) एलजीबीटी समुदायाच्या हितासाठी दिल्ली, मुंबई, पुणे आणि जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे.
या विचाराचे (एलजीबीटी) समर्थन करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरने ‘आम्ही तुमचे खुलेपणाने स्वागत करतो असे म्हटले आहे. तसेच, ही तर फक्त सुरुवात आहे. तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा,’ असे म्हटले आहे.
दुसर्या एका युजरने आम्हाला रोज समर्थन देणार्यांचे आभार, शांती मार्चमध्ये येण्यासाठी धन्यवाद, आम्ही निश्चितपणे काश्मीरमध्ये या समुदायासाठी गौरव मार्च करू, असे म्हटले आहे.
या विरोधातील एकाने आम्हाला स्वातंत्र्य मान्य आहे. मात्र, यामध्ये इतरांना त्रास देण्याचा हेतू असेल तर मात्र आम्ही अस्वीकार करतो, असे म्हटले आहे. हा कलंक काश्मीरमध्ये येता कामा नये, अत्यंत धोकादायक पद्धतीने ब्रेन वॉशिंग करण्यात आले आहे.
केवायएमचे संस्थापक एमबीएचे विद्यार्थी राहुल यांनी होमोफोबिया हा काश्मीरमध्ये खोलवर रुजलेला असून तो उपटून टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. केवळ काश्मीरमधील लोकांकडूनच नव्हे तर देशभरातून या विषयावर प्रतिक्रिया आल्या आहेत. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथील एलजीबीटी समुदायाच्या अधिकारांचे समर्थन करण्यासाठी मार्च काढण्यात आला. मात्र, काश्मीरमध्ये या समुदायाला समर्थन देताना लोक कचरतात काश्मीर आणि देशातील इतर भागांसाठी समर्थकांचे वेगवेगळे मालक आहेत ही सर्वात विचित्र बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काश्मीरमधील एलजीबीटी समुदायाच्या आपण संपर्कात असून केवायएमने उचललेल्या पावलाला समर्थन देण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. काश्मीरमध्ये आमच्याशी जोडले गेलेले लोक बाहेर जाऊ इच्छित नाहीत, त्यांनाही संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.