ETV Bharat / bharat

'तपास यंत्रणा माझ्या वडिलांच्या थडग्याचंही ऑडिट करतायेत'

काश्मिरातील पिपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह सुरक्षा यंत्रणांवर हल्लाबोल केला आहे. माझ्या विरोधातील एकही आरोप सिद्ध होऊ द्या, मी परिणाम भोगायला तयार आहे, असे वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केले.

author img

By

Published : Jan 3, 2021, 5:31 PM IST

Updated : Jan 3, 2021, 5:51 PM IST

मेहबुबा मुफ्ती
मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर - काश्मिरातील पिपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह सुरक्षा संस्थांवर हल्लाबोल केला आहे. माझ्या विरोधातील एकही आरोप सिद्ध होऊ द्या, मी परिणाम भोगायला तयार आहे, असे वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केले. मुफ्ती यांची राष्ट्रीय तपास यंत्रणासह विविध सरकारी संस्थांकडून भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी सुरू आहे. पीडीपीच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही वेगवेगळ्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.

थडग्याचीही सुरू आहे चौकशी -

माझे वडील सईद मोहम्मद मुफ्ती यांच्या थडग्याचे तपास यंत्रणांकडून ऑडिट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तपास यंत्रणा माझे जुने रेकॉर्ड तपासून पाहत आहेत. आता तर त्यांनी माझ्या वडिलांच्या थडग्याची चौकशी सुरू केली आहे. हे खुप धक्कादायक आहे. मात्र, त्यांना तपासातून काहीही हाती लागत नसल्याचे त्या म्हणाल्या.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची सुरू आहे चौकशी -

मेहबुबा मुफ्ती यांचे वडील सईद यांचे २०१६ साली निधन झाले. दक्षिण काश्मिरातील बीजीहेरा येथील त्यांच्या वडिलोपार्जित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री असताना झालेल्या कथित घोटाळ्यांचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. मात्र, यातील कोणत्याही प्रकरणात काहीही सापडले नसून जर एखादा आरोप सिद्ध झाला तर मी परिणाम भोगायला तयार आहे, असे मुफ्ती म्हणाल्या. मला दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा खोटा आरोप-

पीडीपीच्या युवा संघटकाला अटक केल्याच्या प्रकरणावरही त्यांनी वक्तव्य केले. युवा आघाडीचा प्रमुख वहीद पारा याचीही एनआयएकडून चौकशी सुरू आहे. वहीद लोकशाहीचा पुरस्कर्ता असून त्याने अनेक काश्मिरी तरुणांना मुख्य प्रवाहात आणले आहे. मात्र, त्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असे मुफ्ती म्हणाल्या. हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी संबध असल्याच्या आरोपावरून वहीद पारा यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केले आहे. निवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी हिजबुलचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न मुफ्ती यांनी केला, असा आरोप पीडीपीवर ठेवण्यात आले आहेत.

Last Updated : Jan 3, 2021, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.