नवी दिल्ली - केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या मंत्र्याच काम अर्थव्यस्था सुधारणे आहे, कॉमेडी सर्कस चालवणे नाही, असा टोला त्यांनी गोयल यांना लगावला आहे.

'भाजप नेत्यांना जे काम मिळाले आहे. ते करण्यापेक्षा दुसऱयांना मिळालेल्या यश लाथाडण्याचे काम करत आहेत. नोबेल मिळवणाऱ्या व्यक्तीने आपले काम प्रामाणिकपणे केले आणि नोबल जिंकले. अर्थव्यवस्था ढासाळत चालाली आहे. तुमचे काम ती सुधारणे आहे. ना की एक कॉमेडी सर्कस चालवणे', असे प्रियंका गांधी यांनी टि्वट करून म्हटले आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणा साधला होता. अभिजित यांनी काँग्रेसला न्याय योजना तयार करण्यासाठी मदत केली होती. जी योजना भारतीय जनतेन पाहिलीही आणि नाकारली ही. त्यांच्याविषयी लोकांना माहिती आहे की, ते डाव्या विचारधारेला समर्थन करतात, असे गोयल एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
नुकतचं अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त केली होती. भारतीय अर्थव्यवस्था डगमगली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल, असे वाटत नसल्याचे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले होते.
यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना मिळाला आहे. हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.