ETV Bharat / bharat

उन्नाव प्रकरणाचे आरोपी भाजपशी संबंंधित असल्यामुळेच त्यांचा बचाव - प्रियांका गांधी - उत्तरप्रदेश बलात्कार

उन्नावच्या पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना तिच्यावर पाच जणांनी हल्ला केला. रॉकेल टाकून तिला पेटवण्यात आले.

DELHI
प्रियांका गांधी
author img

By

Published : Dec 7, 2019, 12:48 PM IST

Updated : Dec 7, 2019, 1:58 PM IST

नवी दिल्ली - पीडितेच्या कुटुंबाला सारख्या धमक्या येत होत्या. तरी सुद्धा पोलिसांनी लक्ष दिले नाही. आरोपींचा भाजपच्या नेत्यांशी संबंध आहे म्हणूनच त्यांचा बचाव केला जात आहे असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केला. उन्नाव पीडितेच्या घरी त्यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या.

प्रियांका गांधी

उत्तर प्रदेशमध्ये रोज महिलांवर अत्याचार होत आहेत. उन्नावमधील लैंगिक अत्याचार पीडितेवर रॉकेल टाकून पेटवण्यात आले. यातच तिचा अंत झाला. या प्रकारचे अत्याचार थांबवण्यासाठी सरकार काय करत आहे, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केला. उन्नाव पीडितेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आज आणण्यात आला.

उन्नावच्या पीडितेला संरक्षण का देण्यात आले नव्हते. ज्या पोलिसाने तक्रार दाखल करुन घेण्यात टाळाटाळ केली त्याच्यावर कोणती कारवाई झाली. रोज घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, असे प्रश्न प्रियांका यांनी उपस्थित केले.

हेही वाचा - गुन्हेगारांचा दया अर्ज फेटाळून चौघांनाही फाशी द्या, निर्भयाच्या आईची मागणी

दरम्यान, उन्नावच्या पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना तिच्यावर पाच जणांनी हल्ला केला. रॉकेल टाकून तिला पेटवण्यात आले. यात ती बहुतांश जळाली होती. लखनौच्या रुग्णालयातून तिला दिल्लीला हलवण्यात आले. तिथे ती मृत्यूशी झुंज देत होती. सरतेशेवटी उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा - 'त्या' एन्काऊंटरच्या चौकशीसाठी एफआयआर करण्याची परवानगी द्या, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

प्रियांका गांधी म्हणाल्या, की पीडितेच्या कुटुंबाला ही परिस्थिती सहन करण्याचे देव धैर्य देवो. तिला न्याय देऊ शकलो नाही हे आपल्या सगळ्यांचे अपयश आहे. समाज म्हणून आपण सगळेच गुन्हेगार आहोत. पण, उत्तरप्रदेश सरकारची कायदा आणि सुव्यवस्था किती पोकळ आहे हे यातून दिसते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 7, 2019, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.