ETV Bharat / bharat

चुकीच्या धोरणांमुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित - पृथ्वीराज चव्हाण - panji

मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. बेरोजगारी वाढत असल्याने युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Feb 9, 2019, 5:16 AM IST

पणजी - भाजपच्या धोरणाला कंटाळून विविध पक्षांच्या आघाड्या होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चितच आहे, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचा ८० व्या वाढदिवसानिमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे चव्हाण म्हणाले की, मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. बेरोजगारी वाढत असल्याने युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला आहे. तर नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे. केंद्रातील भाजप आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी विविध राजकीय पक्ष आघाड्या करत आहेत. भाजप निवडून येणार नाही याला सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत. लोकांमध्ये सरकार विषयी विश्वासघातकी भावना निर्माण झाली आहे. भाजप धार्मिक आधारावर लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

तर गोव्यातील राजकीय परिस्थिती विषयी बोलताना चव्हाण म्हणाले, गोव्यात पोटनिवडणुकीची शक्यता कमी आहे. गोवा सरकारमध्ये अस्थिरता आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा बरखास्त करून निवडणुकीला सामोरे जावे. पोटनिवडणुकी ऐवजी ते सरकारच बरखास्त करण्याची शक्यता आहे.

undefined

प्रतापसिंह राणे १९७२ पासून आतापर्यंत सलग ११ वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येत ६ वेळा मुख्यमंत्री बनले आहेत. तर एक वेळा सभापती आणि विरोधी पक्ष नेते म्हणून गेली ४७ वर्षे सभागृहात आहेत. त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त चव्हाण यांच्या हस्ते शाल, मानपत्र आणि समई भेट देत सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे गोवा प्रभारी सरचिटणीस अमित देशमुख, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, विजयादेवी राणे, सर्व आमदार, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.