उत्तरकानडा - एमईएस चैतन्य पीयू महाविद्यालातील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन हातोड्याने फोडून त्यांचा चुराडा केला. कर्नाटक राज्यातील सिरसी येथे ही घटना घडली आहे.
पीयू कॉलेज कॅम्पसमध्ये मोबाइल बंदी करण्यात आली होती. दरम्यान प्राचार्य भट्ट यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्यांना काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन आढळून आले. नियम तोडल्यामुळे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या मोबाईल फोनचा हातोड्याने चुराडा केला आहे.
हेही वाचा - कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानकडून राजनैतिक सहाय्य मिळण्यासाठी भारत प्रयत्न करणार - परराष्ट्र मंत्रालय
या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून प्राचार्यांच्या धाडसी वर्तनाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.