नवी दिल्ली - दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मन की बात झाला. हा कार्यक्रम ४ महिन्यानंतर होत असून २४ फेब्रुवारीला त्यांनी शेवटचा मन की बात कार्यक्रम केला होता.
मोदींनी मन की बात कार्यक्रमात आणीबाणीच्या परिस्थितीचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आणीबाणी लागू केल्यानंतर याचा विरोध फक्त राजकीय पक्षांनीच केला नव्हता. हे सर्व फक्त तुरुंगापुरते मर्यादित नव्हते. सामान्य माणसांचा मनात आणीबाणी विरोधात राग होता. लोकशाही हिसकावून घेतल्यामुळे जनतेच्या मनात बैचेनी होती. आणीबाणीवेळी लोकशाहीचे महत्व सर्वांना पटले. यासह मोदींनी पाणी आणि योगदिवसाबद्दल भाष्य केले.
ठळक मुद्दे -
- चांगले आरोग्य असलेली व्यक्ती समाज घडवण्यासाठी मदत करते. योग हेच काम करते. त्यामुळे योग करणे समाजसेवेपेक्षा कमी नाही.
- ज्याठिकाणी योग होत नाही, अशी एकही जागा नाही. २१ जूनला पुन्हा एकदा सर्वांनी उत्साहाने आपल्या परिवारांसोबत योग दिवस साजरा केला. योग दिवसासाठी महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल पंतप्रधान पुरस्कार देण्यात आले आहेत.
- सामूहिक प्रयत्नांचे परिणाम सकारात्मक असतात. पूर्ण देशात पाण्याचा संकंटापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वांनी मिळून आपआपल्या भागात प्रयत्न केले पाहिजेत.
- मागील काही महिन्यात पाणी संबंधित मुद्यावर अनेक जणांनी लिहिले आहे. पाणी संवर्धनावर जागरुकता बघून मला आनंद होत आहे.
- देशात आणीबाणी लावण्यात आली होती तेंव्हा त्याचा विरोध फक्त राजकारणापुरता मर्यादित नव्हता. हा विरोध जनतेतील प्रत्येक ह्रदयातून येत होता.
- मन की बात देश आणि समाजासाठी आरशाप्रमाणे आहे. यामुळे आपल्याला देशातील अंतर्गत मजबूती, ताकद आणि प्रतिभा जाणवते.
- लोकशाहीबद्दल बोलताना मोदी म्हणाले, लोकशाही आपली संस्कृती आहे, ही आपली विरासत आहे आणि आपल्याला याला पुढे घेवून जायचे आहे.
- लोकसभा निवडणुकीचे यशस्वी नियोजन केल्यामुळे निवडणूक आयोगाचे कौतुक
- 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींचा आणीबाणीवरुन परिस्थितीवरून काँग्रेसवर निशाणा
लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटची 'मन की बात' मोदी यांनी २४ फेब्रुवारीला केली होती. त्यात 'नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक'ची माहिती त्यांनी दिली होती.
पंतप्रधान मोदी जपानमध्ये ओसाका येथे आयोजित G२० शिखर परिषदेवरून शनिवारी मायदेशी परतले. या परिषदेत शेवटच्या दिवशी बऱ्याच देशातील नेत्यांशी त्यांची चर्चा झाली. मोदी यांनी ओसाकामध्ये ब्राझील, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली. या परिषदेत व्यापार, पर्यावरण, दहशतवाद आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर जोर देण्यात आला.
भारतीय जनता पक्ष मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तेत आला आहे. ३० मे'ला नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी ५३ वेळा मन की बात मधून राष्ट्राला संबोधित केले होते.