ETV Bharat / bharat

'मन की बात' मध्ये मोदी म्हणाले..'चांद्रयान-२ चे प्रक्षेपण पाहून मन अभिमानाने भरून आले' - पंतप्रधान

मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकालातील आजचा दुसरा 'मन की बात' कार्यक्रम होता. मोदींनी कार्यक्रमात चांद्रयान-२ चा उल्लेख केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केले.

मोदी
author img

By

Published : Jul 28, 2019, 1:07 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाद्वारे राष्ट्राला संबोधित केले आहे. मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील आजचा दुसरा 'मन की बात' कार्यक्रम होता. मोदींनी कार्यक्रमात चांद्रयान-२ चा उल्लेख केला. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केले. मोदी म्हणाले, ‘चांद्रयान-२' पूर्णतः स्वदेशी मिशन असून चांद्रयान-२ चे दृश्य पाहिल्यानंतर मन अभिमानाने भरून आले.

ठळक मुद्दे -

  • मन की बात या कार्यक्रमात मोदींनी जल संरक्षणावर भर दिला. पाण्याची समस्या पुर्ण भारतात निर्माण झाली आहे. जलसंरक्षणासाठी युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हरियाणामधील शेतीचा उल्लेख केला. हरियाणामध्ये कमी पाणी लागणारे पीक घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
  • मोदींनी अमरनाथ यात्रेमध्ये जम्मु काश्मीरच्या लोकांनी केलेल्या मदतीची प्रशंसा केली. तर गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या यात्रेमध्ये सर्वांत जास्त श्रद्धाळू सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
  • पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थी आणि तरुणांना एका प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या मुलांना 7 सप्टेंबरला श्रीहरीकोटा येथे नेण्यात येईल आणि त्यांना चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्याची संधी मिळेल.
  • सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्या मन की बात या कार्यक्रमात मोदींनी जल संरक्षणावर भर दिला होता. लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'द्वारे संवाद साधताना केले होते.
  • लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटची 'मन की बात' मोदी यांनी २४ फेब्रुवारीला केली होती. त्यात 'नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक'ची माहिती त्यांनी दिली होती.
  • भारतीय जनता पक्ष मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तेत आला आहे. ३० मे'ला नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी ५३ वेळा मन की बात मधून राष्ट्राला संबोधित केले होते.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.