नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे उपस्थित आहेत. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
पत्रकार परिषदेत अध्यक्ष अमित शाह हे एनडीएच्या पाच वर्षातील कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्ण बहुमताचे सरकार बनणार याची खात्री असल्याचे सांगितले.
मोदी म्हणाले...
- भारताची लोकशाही समृध्द
- निवडणुका सकारात्मपणे झाल्या
- पाच वर्षात देशाने आशिर्वाद दिले
- या पाच वर्षात देशाने केले सहकार्य
- आमच्या योजना तळागळापर्यंत पोहोचवल्या
शाह म्हणाले...
- मतदाता आपले मत कोणाला द्यायचे हे स्वत : ठरवतो
- आमचे संघटन हीच आमची ताकद
- खोट्या प्रचाराचा आम्हाला फरक पडणार नाही
- फक्त बंगालमध्येच हिंसा का ? तेथे आमचे कार्यकर्ते मारले गेले
- पत्रकारांनी ममतांना प्रश्न विचारावा
- आम्ही ३०० पेक्षा जास्त जागा जिंकणार
- महात्मा गांधीविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विरोधात पक्ष कारवाई करणार
- आमचे सिध्दांत मानणारा कोणताही पक्ष आमच्यासोबत येऊ शकतो
- भगवा दहशतवाद काल्पनिक आहे, हे षडयंत्र काँग्रेसचे
- भाजपचे नेते विकासाविषयीच बोलतात
- राफेलमध्ये भ्रष्टाचार नाही