ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : रस्त्यात कार बिघडली अन्...गर्भवती महिलेच्या मदतीला धावले पोलीस

author img

By

Published : Mar 28, 2020, 1:29 PM IST

Updated : Mar 28, 2020, 2:28 PM IST

लॉकडाऊनदरम्यान गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहचवण्यास पोलिसांनी मदत केली. प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर पत्नीला रात्री 12 वाजता रुग्णालयात घेऊन जात असताना कार अचानक बंद पडली. लॉकडाऊन असल्याने इतर कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. मात्र, पोलिसांनी या दाम्पत्याला मदत करत रुग्णालयात पोहचविले. ही घटना कोलकाता शहरात गुरुवारी रात्री घडली.

गर्भवती महिलेच्या मदतीला धावले पोलीस
गर्भवती महिलेच्या मदतीला धावले पोलीस

कोलकाता - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनदरम्यान एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहचवण्यास पोलिसांनी मदत करून पोलिसांसातील माणुसकीचे दर्शन घडवले. एका महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात घेऊन जात असताना कार अचानक बंद पडली. लॉकडाऊन असल्याने इतर कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. मात्र, पोलिसांनी या दाम्पत्याला मदत करत रुग्णालयात पोहचविले. ही घटना कोलकाता शहरात गुरुवारी रात्री घडली.

ईशीता दास असे या गर्भवती महिलेचे नाव आहे. प्रगती मैदान परिसरात राहणाऱ्या ईशीता दास यांना गुरुवारी रात्री प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांचे पती सुभाष दास यांनी त्यांना कारने रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, ख्रिस्तोफर रोड येथे त्यांची कार बंद पडली. संपूर्ण देशात संचारबंदी असल्याने त्यांना रात्रीची मदतही मिळेना.

रात्रीची वेळ असल्याने टॅक्सी, रिक्षा काहीही वाहन मिळेना. त्यामुळे पती सुभाष यांनी जवळील पोलीस चौकीकडे धाव घेतली. तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने तत्काळ तांगरा पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर लगेच गाडीची व्यवस्था करत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने दास दाम्पत्याने पोलिसांचे आभार मानले.

आम्हाला रुग्णालयात निघण्यास आधीच उशीर झाला होता. त्यात कार बंद पडल्याने इतर वाहन मिळण्याची श्यकता नव्हती. आणीबाणीच्या काळात मदत केल्यामुळे मी पोलिसांचे आभार मानतो, असे सुभाष दास म्हणाले.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी येत्या 14 एप्रिलपर्यंत नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लोक घरामध्येच राहावेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

Last Updated : Mar 28, 2020, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.