जयपूर- जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू आहे. अत्यावश्यक सेवा व वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील कामधंदे बंद झाल्याने कामगारांनी स्थलांतर सुरू केले आहे. राजस्थानमधील जामोर जिल्ह्यीतल एका तरुण कामगाराने तब्बल 1 हजार 800 किमीचा प्रवास 6 दिवसात पार केला आहे. हे अंतर त्या तरुणाने रस्त्याने मिळेल ते वाहन, पायपीट करीत गाठले आहे.
हेही वाचा- तबलिगी मरकझ: लातुरात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' 12 पैकी 8 जणांचा अहवाल 'पाॅझिटिव्ह'
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 12 वा दिवस आहे.