ETV Bharat / bharat

भाजपमध्ये चहावाला पंतप्रधान तर पेपरवाला पक्षाचा अध्यक्ष - प्रताप सारंगी

भाजपमध्ये चहा विकणारा पंतप्रधान बनतो तर, पेपर टाकणारा पक्षाचा अध्यक्ष बनतो आणि झोपडीत राहणारा केंद्रीय मंत्री बनतो. हा पक्ष असा आहे, की येथे सर्वांना समान संधी मिळते, असे वक्तव्य पशुपालन, डेअरी आणि मत्स्य विभागाचे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी
author img

By

Published : Jun 9, 2019, 5:25 PM IST

भुवनेश्वर - केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी भाजपची स्तुती करताना म्हटले आहे, की भाजपमध्ये चहा विकणारा पंतप्रधान बनतो तर, पेपर टाकणारा पक्षाचा अध्यक्ष बनतो आणि झोपडीत राहणारा केंद्रीय मंत्री बनतो. हा पक्ष असा आहे, की येथे सर्वांना समान संधी मिळते.

केंद्रीय मंत्री बनल्यानंतर प्रताप सारंगी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. बालासोर येथून लोकसभा जिंकणारे प्रताप सारंगी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रीपद सोपवून मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आता मला त्यांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. मला मंत्रीपदाची लालसा नव्हती. हे पद लोकांची सेवा करण्यासाठी आहे. याचा लाभ उठवणे हा माझा हेतू नाही.

प्रताप सारंगी मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांना पशुपालन, डेअरी आणि मत्स्य विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाहांनी सारंगी यांना २ वेळा फोन केला होता. यावर सारंगी म्हणाले, अमित शाहांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले, की तुम्हांला कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे. याचे मला आश्चर्य वाटले होते.

Intro:Body:

Nat 03

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.