ETV Bharat / bharat

कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी - प्रकाश जावडेकर

मंत्रिमंडळाने ३ जुलै २०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये ६ महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यासोबतच, तिहेरी तलाक विधेयक आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

author img

By

Published : Jun 12, 2019, 9:04 PM IST

मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली - मंत्रिमंडळाचे वाटप झाल्यानंतर आज पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक झाली. बैठकीत सरकारच्या विविध योजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच जम्मू- काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट कालावधीही ६ महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

प्रकाश जावडेकर यांनी माहिती देताना सांगितले की, मंत्रिमंडळाने ३ जुलै २०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये ६ महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यासोबतच, तिहेरी तलाक विधेयक आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाच्या विधेयकालाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ७ हजार शिक्षकांची थेट भर्ती केली जाणार आहे. बैठकीत जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक, २०१९ ला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे. विविध शैक्षणिक संस्थात प्रवेश आणि पदोन्नतीसाठी या आरक्षणाचा लाभ होणार आहे.

बैठकीत ५ जुलै रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात एकूण १० प्रमुख विधेयके सादर करण्यात येणार आहेत.

Intro:Body:

ajay

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.