लखनौ - बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात शनिवारी प्रकाश शर्मा यांची साक्ष झाली. सीबीआयने त्यांना तब्बल १०२४ प्रश्न विचारले. यावेळी बाहेर आल्यानंतर प्रकाश शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माणाबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे साक्ष घेण्याचे काहीच औचित्य नाही. हे प्रकरण राजकारणाने प्रेरीत आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करता येणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
सीबीआयच्या या विशेष न्यायालयात ४ जूनपासून साक्षीदारांच्या साक्ष घेण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विजय बहाद्दुर, राम विलास वेदांती, विनय कटियार आदी पोहोचले होते. मात्र फक्त विजय बहाद्दुर यांचीच साक्ष नोंदवण्यात आली होती.
याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राज्यपाल कल्याण सिंह, उमा भारती, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार आदींची साक्ष होणार आहे.