नवी दिल्ली - कोरोना विरोधातील लढाई लढताना भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणांची कमतरता भासत आहे. त्यामुळे विविध देशांकडून सुरक्षा उपकरणे मागविण्यात येत आहेत. नुकतेच चीनकडून मागविण्यात आलेले 'पर्सनल प्रोटेक्टिव्ह एक्विपमेंट' सुरक्षेचे निकष पूर्ण करत नसल्याचे आढळून आले आहे.
चीनकडून भारताला 63 हजार पीपीई किट मिळाले आहेत. मात्र, सुरक्षा नियमांची चाचणीत ते पास होत नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे. चीनमधून येणारी उपकरणे आणि कोरोना चाचणी किट सदोष असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता चीनकडून मागविण्यात आलेली पीपीई भारत वापरणार की नाही, हा प्रश्न उभा राहीला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 835 झाला आहे. यातील 11 हजार 616 जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 1 हजार 766 जणांचा मृत्यू झाला असून 452 जण दगावले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायने दिली आहे. भारतही स्वदेशी बनावटीची